घरताज्या घडामोडीकोरोना उपाययोजनांबाबत मुंबईतील सेव्हन हिल्स् रुग्णालयात रंगीत तालीम

कोरोना उपाययोजनांबाबत मुंबईतील सेव्हन हिल्स् रुग्णालयात रंगीत तालीम

Subscribe

मुंबई: चीन व अन्य काही देशात कोरोनाची पुन्हा एकदा लाट आली आहे. भारतात गुजरात व इतर काही राज्यातही कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने मुंबईसह सर्व प्रमुख शहरांना अलर्ट केले आहे. कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर कशाप्रकारे औषधोपचार करावेत, उपाययोजना कशी करावी, यंत्रणा सज्ज ठेवणे आदींबाबत पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या सेव्हन हिल्स या रुग्णालयात आज दुपारी रंगीत तालीम घेण्यात आली.

वैद्यकीय प्राणवायू (ऑक्सिजन)ची उपलब्धता व क्षमता तसेच प्राणवायू वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची तपासणी, सर्व प्रकारच्या अतिदक्षता विभागांमधील उपकरणे सुव्यवस्थितपणे कार्यरत आहेत. याची खातरजमा, कोरोना रुग्ण दाखल करुन घेताना पाळावयाची आदर्श कार्यपद्धती, कोरोना बाधितांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी यांनी पाळावयाच्या आदर्श नियमावलीचे प्रशिक्षण, तसेच अचानक रुग्ण संख्या वाढल्यास अतिदक्षता उपचारांची आवश्यकता असणारे रुग्ण व अन्य कोरोना बाधित यांच्यावर एकाचवेळी उपचार करताना पाळावयाच्या वैद्यकीय पद्धती या सर्व मुद्यांवर प्रात्यक्षिके आणि रंगीत तालीम मंगळवारी घेण्यात आली.

- Advertisement -

कोरोना उपचारांसाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती सुव्यवस्थितपणे कार्यरत आहे, याची खातरजमा करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार ही प्रात्यक्षिके व रंगीत तालीम करण्यात आली, अशी माहिती रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार यांनी दिली.


हेही वाचा : दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचलेला; माजी पीएचा धक्कादायक आरोप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -