घरठाणेभिवंडीत रेझिंग डे अंतर्गत पोलिसांकडून ८० लाख ७९ हजारांच्या मुद्देमालाचे हस्तांतरण

भिवंडीत रेझिंग डे अंतर्गत पोलिसांकडून ८० लाख ७९ हजारांच्या मुद्देमालाचे हस्तांतरण

Subscribe

भिवंडी । भिवंडी परिमंडळ २ अंतर्गत फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारींचा तपास करून गुन्हेगारांना अटक केली आणि त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या ८० लाख ७९ हजार रुपये किंमतीच्या वस्तू आणि वाहनांचे हस्तांतरण पोलिस उपयुक्त नवनाथ ढवळे यांच्या हस्ते फिर्यादींना करण्यात आले.

पोलीस रेझिंग डे सप्ताह अंतर्गत हा कार्यक्रम शुक्रवारी पोलीस संकुलात आयोजित करण्यात आला. या प्रसंगी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, पूर्व विभागाचे सहा. पोलीस आयुक्त किशोर खैरनार आणि पश्चिम विभागाचे सहा. पोलीस आयुक्त सुनील वडके यांच्यासह परिमंडळ २ मधील सहा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी भोईवाडा, निजामपूर, भिवंडी शहर, नारपोली, शांतीनगर, कोनगाव पोलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांचा तपास करून जप्त करण्यात आलेला ८० लाख ७९ हजाराचा मुद्देमाल फिर्यादींना देण्यात आला.

- Advertisement -

या मुद्देमालात सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी, ऑटो रिक्षा व मोबाईल अशा किमती वस्तू आणि वाहनांचा समावेश होता. या प्रसंगी दागिने मिळाल्यानंतर महिलांनी आपल्या भावना व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले. तर पोलिस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कर्तव्याचे आणि कामगिरीचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -