१ कोटींहुन अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला अटक; आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी

मत्सपालन व्यवसायाकरीता तक्रारदारांसह १३ गुंतवणुकदारांकडून ठेवी स्विकारून त्याच्यावर आकर्षक परताव्याचे अमिष दाखवत, त्यांची एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणुक करणाऱ्या एका त्रिकुटाला बेड्या घालण्यात ठाणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

terrorist arrested

ठाणे: मत्सपालन व्यवसायाकरीता तक्रारदारांसह १३ गुंतवणुकदारांकडून ठेवी स्विकारून त्याच्यावर आकर्षक परताव्याचे अमिष दाखवत, त्यांची एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणुक करणाऱ्या एका त्रिकुटाला बेड्या घालण्यात ठाणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्या त्रिकुटाला येत्या ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. (Trio arrested for defrauding more than Rs 1 crore Performance of Financial Offense Branch)

या प्रकरणात असंख्य गुंतवणुकदारांनी गुंतवणुक केली, असल्याचे तपासात पुढे आलेले आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संख्येत व फसवणुक झालेल्या रकमेत खुप मोठया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तर,ज्या गुंतवणुकदारांनी या गुन्हयात उघडकीस आलेल्या दोन कंपन्याच्या गुंतवणुक योजनेमध्ये गुंतवणुक केली, त्यांनी ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखा येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अटक केलेल्या त्रिकुटामधील कल्याण,खडकपाडा सर्कल येथील अजय कृपाशंकर श्रीबस्तक, (३५), तर कल्याण पत्री पुलाजवळील सलिम चांद सय्यद (४३) आणि कल्याण, मुरबाड रोडवरील मोहमद रजा याकुब खान, (३४) यांच्यासह फरार असलेल्या उल्हासनगर नंबर ५ मधील इशाक जुम्मन अन्सारी या चौकडीने FLIP DREAM INDIA LLP FLIP DREAM INDIA AQUA LLP या कंपनीच्या स्थापना करत, त्याद्वारे गुंतवणुकदारांना ती चौकडी मत्सपालनाचा व्यवसाय करतात, १ लाख रूपये १२ महिन्यासाठी गुंतवणुक केल्यास १८ हजार रूपये दरमहा परतावा व मुद्दल रक्कम, १ लाख रूपये १८ महिन्याकरीता गुंतवणुक केल्यावर प्रत्येक १ महिन्यानंतर ११ हजार ११२ रूपये परतावा व मुद्दल रक्कम तसेच BIO-FLOC स्किममध्ये २ लाख रूपये २ वर्षाकरीता गुंतवणुक केल्यास ०४ महिन्यानंतर ७६ हजार रूपये ६ वेळा असे ४ लाख ५६ हजार रूपये परतावा व मुद्दल रक्कम व १ लाख रूपये बोनस असे एकुण ५ लाख ५६ हजार रूपये परतावा व मुद्दल रक्कम तसेच १२ व १८ महिन्यांकरीता ठराविक रक्कम गुंतविल्यास तसेच जसे जसे गुंतवणुकदार पिरॅमिडप्रमाणे वाढत जाईल अशा प्रत्येक ठराविक टप्प्यावर गुंतवणुकदार यांना मोबाईल, लॅपटॉप, फॉरेन ट्रिप, बुलेट, मारुती कार, लक्झरीयस कार, १ बीएचके फ्लॅट, २ बीएचके फ्लॅट, बंगलो, ५० लाख कॅश, १ कोटी रॉयल्टी अशा अशक्यप्राय गुंतवणुक योजनेची माहिती देत, फिर्यादी व १३ गुंतवणुकदारांना प्रोत्साहित करून त्यांचा विश्वास संपादन करून तक्रारदारांकडून ५ लाख २० हजार रूपयांची व १३ गुंतवणुकदारांची मिळून एकुण १ कोटी सात लाख १५ हजार रुपये ठेवी स्वरूपात स्विकारून ती रक्कम व परतावा परत न देता त्यांची आर्थिक फसवणुक करून अपहार केला.

याप्रकरणी त्या चौकडीविरोधात महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन भादवी कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबधाचे संरक्षण करण्याचा अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अजय श्रीबस्तक , सलिम चांद सय्यद आणि मोहमद रजा याकुब खान या तिघांना ३० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना येत्या ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ही कामगिरी ठाणे शहर पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे व सहायक पोलीस आयुक्त अरविंद वाढणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिशचंद्र राठोड यांच्या पथकाने केली.


हेही वाचा – राज्यात 1 हजार 600 नवे रुग्ण; तर 1,864 रुग्ण कोरोनामुक्त