घरमहाराष्ट्रतुनिषाने याआधीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न

तुनिषाने याआधीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

टीव्ही मालिका कलाकार तुनिषा शर्माने याआधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शिझाननेच तिला वाचवले होते, अशी माहिती पोलीस तपासात शिझान खानने दिली आहे.

तुनिषा आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर शिझान खानला तुनिषाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या शिझानने तुनिषाने याआधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण आपणच तिला वाचवले होते. याची कल्पना तिच्या आईला देऊन काळजी घेण्यासही सांगितल्याचे शिझानने पोलिसांना सांगितले आहे.

- Advertisement -

तुनिषाच्या शवविच्छेदनात प्राथमिक तपासात ती गर्भवती नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तुनिषा शर्मा गर्भवती असल्याची बातमी खोटी असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. तुनिषाप्रकरणी वालीव पोलिसांनी तिच्या सहकलाकारांसोबत इतर कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, तुनिषाची आई वनिताने शिझानला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. शिझानचे आणखी मुलींशी प्रेमसंबंध होते. त्याने तुनिषाचा वापर केला. त्यामुळे तुनिषा नैराश्यात होती, असा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -