घरठाणेठाणे ते बोरीवली प्रवास आता 'या' पर्यायी मार्गावरून करा अवघ्या २० मिनिटांत

ठाणे ते बोरीवली प्रवास आता ‘या’ पर्यायी मार्गावरून करा अवघ्या २० मिनिटांत

Subscribe

ठाण्याहून बोरीवलीला रस्तेमार्गे जाताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, प्रवाशांना होणार वाहतूक कोंडीचा त्रास आता लवकरच दूर होणार आहे. कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून ठाणे ते बोरिवली दरम्यान दोन भुयारी मार्ग (ट्विन ट्युब बोगदा) खोदून वाहतुकीचा हा नवा पर्याय खुला करण्यासाठी ‘एमएमआरडीए’कडून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

ठाण्याहून बोरीवलीला रस्तेमार्गे जाताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, प्रवाशांना होणार वाहतूक कोंडीचा त्रास आता लवकरच दूर होणार आहे. कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून ठाणे ते बोरिवली दरम्यान दोन भुयारी मार्ग (ट्विन ट्युब बोगदा) खोदून वाहतुकीचा हा नवा पर्याय खुला करण्यासाठी ‘एमएमआरडीए’कडून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील प्रचंड वाहतूककोंडी टाळून बोरीवली ते ठाणे असा प्रवास अवघ्या वीस मिनिटांत करणे शक्य होणार आहे. (Twin Tunnel Work To Begin From Borivali To Thane Before Monsoon)

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली-मागाठाणे-एकता नगरमधून ठाणे मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडी जवळ हा भुयारी मार्ग तयार होणार आहे. प्रत्येक भुयारामध्ये तीन मार्गिका अशा दोन्ही भुयारांमध्ये एकूण सहा मार्गिका असणार आहेत. या बोगद्याच्या कामासाठी ‘एमएमआरडीए’कडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, पुढील चार वर्षांत ही कामं पूर्ण करण्याचे नियोजन ‘एमएमआरडीए’ने केल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

शिवाय, ‘एमएसआरडीसी’कडून नियोजित करण्यात आलेला हा प्रकल्प तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार, या प्रकल्पाचे आता ‘एमएमआरडीए’कडे हस्तांतरण करण्यात आले आहे.

दरम्यान, ठाणे हद्दीत या प्रकल्पाची लांबी पाच किमी असून सरासरी रुंदी ७० मीटर आहे. या प्रकल्पासाठी ३४ हेक्टर जमीन बाधित होणार होती. या भागातील आरक्षित जागांचे आरक्षणही ठाणे महापालिकेकडून बदलण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. अवघ्या ३ हजार कोटी रुपयांच्या मूळ प्रकल्पावर वन विभागाच्या जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागा देण्याची अट असल्यामुळे या प्रकल्पाचा खर्च ११ हजार कोटींपर्यंत वाढला आहे.

- Advertisement -

ठाण्यातील टिकूजी-नी-वाडी ते बोरीवली मागाठाणे २४ किमी अंतर वाहनाने पूर्ण करण्यासाठी सध्या एक ते दीड तास लागत आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या खालून भुयारी मार्गाने हे अंतर ११.८४ किमी इतके कमी होऊ शकणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास १५ ते २० मिनिटे इतका कमी होऊ शकणार आहे. यामध्ये १०.८ किमी लांबीचे दोन भुयारी मार्ग असून त्यांना शहरातील रस्त्यांवर जोडण्यासाठी जोडरस्ते तयार केले जाणार आहेत.


हेही वाचा – आता जाणता राजावरून कलगीतुरा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -