घरताज्या घडामोडीपुण्यातील १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत कोसळली!

पुण्यातील १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत कोसळली!

Subscribe

पुण्यातील बुधवारपेठ परिसरात 'सिंगालिया' हा ९० ते १०० वर्ष जुना वाडा आहे. या वाड्याचा जवळजवळ ७५ टक्के भाग रविवारी सकाळी सातच्या सुमारास कोसळला आहे.

पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील ९० ते १०० वर्षे जुना असलेल्या वाड्याचा काही भाग रविवारी सकाळी कोसळला आहे. या प्रसंगी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलय. या घटनेत ७० वर्षीय वृद्धमहिलेसह आणखी एक जण जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले व मदत कार्याला सुरूवात केली.

कशी घडली घटना?

पुण्यातील बुधवारपेठ परिसरात ‘सिंगालिया’ हा ९० ते १०० वर्ष जुना वाडा आहे. या वाड्याचा जवळजवळ ७५ टक्के भाग रविवारी सकाळी सातच्या सुमारास कोसळला आहे. घटना घडली असताना यात दोन जन जखमी अवस्ठेत आढळल्यानंतर अग्निशमन दलाला त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेत एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

पुण्यातील बुधवार पेठ या परिसरातील संबंधित घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हजर झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ‘या घटनेत जखमी अवस्थेत आढळलेले दोघेही एकाच मजल्यावर राहत होते. गंगुबाई कल्याणी (७०) आणि विनायक कल्याणी (४८) यांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले, असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदिप खेडेकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे. तसेच ‘हा वाडा अतिशय जुना असून या वाड्यात या दोन सदस्यांखेरीज कोणीही राहत नव्हते. प्रसंगी घटनास्थळी अद्याप ढिगारा हटवण्याचे काम सुरू असल्याचे’ देखील ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा-  ‘रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली…आणि होत्याचं नव्हतं झालं’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -