घरताज्या घडामोडीबारसूमधील रिफायनरीबाबत पवारांना माहिती दिली - उदयोगमंत्री उदय सामंत

बारसूमधील रिफायनरीबाबत पवारांना माहिती दिली – उदयोगमंत्री उदय सामंत

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रिफायनरी प्रकल्पासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आम्ही तुम्हाला माहिती देऊ, असं उदय सामंत म्हणाले होते. त्यानुसार उदय सामंत यांनी वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिल्याचं सामंत यांनी सांगितलं.

शरद पवारांची भेट घेतली असली तरी ही कोणत्याही प्रकारची राजकीय भेट नव्हती. ही भेट फक्त नाट्य परिषदेबाबत होती. तसेच शरद पवारांनी काल मला रिफायनरी संदर्भात उद्योगमंत्री या नात्याने फोन केला होता. त्याची सर्व माहिती मी शरद पवारांना दिली आहे, असं उदय सामंत म्हणाले.

- Advertisement -

बारसूमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे. कालची आणि आजची परिस्थिती काय आहे. त्याचप्रमाणे काल ज्या महिलांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली होती. त्यांची देखील सुटका करण्यात आली आहे. अशा विविध गोष्टींची माहिती मी शरद पवारांना दिली आहे. प्रशासनाने आणि शासनाने शेतकऱ्यांसोबत चर्चा केली पाहीजे, असं आमचं एकमत आहे. कारण तिथल्या स्थानिकांसोबत शासन २४ बोलण्यास तयार आहे. त्यामुळे येथील लोकांनी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही, असं उदय सामंत म्हणाले.

उद्या देखील जिल्हा प्रमुखांनी ३२० लोकांसोबत बैठकीचं आयोजन केलं आहे. जसे विरोधक आहेत तसेच त्याठिकाणी विरोधक देखील आहेत. त्याठिकाणी सॉईल टेस्टिंग केली जात आहे. सॉईल टेस्टिंग झाल्यानंतर हा प्रकल्प येथे आणायचा की नाही?, याबाबत कंपनी निर्णय घेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील याला सहकार्य केलं पाहीजे. उद्या आम्ही एक प्रेझेंटेशन देखील तिथल्या लोकांना दाखवणार आहोत. त्यामुळे सर्व गैरसमज आम्ही दूर करू. शासन त्याच्यासाठी कटीबद्ध आहे आणि हीच चर्चा ही शरद पवार यांच्यासोबत झाली आहे, असंही सामंत म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार हे महाराष्ट्र राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांचं मत काय आहे?, हे मी सांगू शकत नाही. परंतु आठ दिवसांत काय नेमक्या घडामोडी झाल्या, याबाबतची संपूर्ण माहिती मी शरद पवारांना दिली आहे, असं सामंत म्हणाले.


हेही वाचा : रिफायनरी प्रकरण : उद्योगमंत्री उदय सामंत घेणार राज ठाकरेंची


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -