घरताज्या घडामोडीरत्नागिरी दौऱ्यामध्ये फडणवीसांच्या गुप्त भेटीवर उदय सामंत यांचा खुलासा

रत्नागिरी दौऱ्यामध्ये फडणवीसांच्या गुप्त भेटीवर उदय सामंत यांचा खुलासा

Subscribe

भाजप नेते निलेश राणेंचा उदय सामंत यांची फडणवीसांसोबत गुप्त भेट झाल्याचा दावा

तौत्के चक्रीवादळामुळे कोकणवासीयांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील नुकासान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणात होते तेव्हा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत फडणीसांना भेटण्यासाठी आले होते असा आरोप करण्यात आला आहे. सामंत यांनी फडणवीसांची गुप्त भेट घेतली असल्याचा दावा भाज नेते निलेश राणे यांनी केला आहे. यावर उदय सामंत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आला आहे. सामंत यांनी फडणीसांची भेट झाल्याचे वक्तव्य फेटाळून लावले आहे. फडणवीस यांच्यासोबत रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट झाली असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत खुलासा केला आहे. कोकणातील तौत्के चक्रीवादळानंतर २० मे रोजी देवेंद्र फडणवीस कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर होते. त्यावेळी दुपारी १ वाजता आपणही रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात नुकसानीचा आढावा घेत होते. तेव्हा दुपारचे २ वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाडही विश्रामगृहावर आपला दौरा आटपून आले होते. यावेळी फडणवीसांसोबत सगळ्यांच्या समवेत माझी सदिच्छा भेट झाली असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भाजप नेते निलेश राणे यांनी फडणवीसांसोबत गुप्त भेट झाल्याचा दावा केला आहे. परंतु सगळ्यांच्या समोर फडणवीसांसोबत फक्त २ मिनिटांची सदिच्छा भेट झाली असल्याचा खुलासा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

भाजप नेते निलेश राणेंनी केला आरोप

भाजप नेते निलेश राणे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्यासोबत गुप्त भेट घेतली असल्याचा दावा केला होता. देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूम पर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत असे ट्विटही निलेश राणे यांनी केले

- Advertisement -

आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -