घरताज्या घडामोडीपाठीत खंजीर खुपसला, सूड तर घेणारच... उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

पाठीत खंजीर खुपसला, सूड तर घेणारच… उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

Subscribe

मुंबईत झालेल्या भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकारे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला मी घेणारच, असा थेट इशाराच ठाकरेंनी शिंदे सरकारला दिला. आजच्या सभेत उद्धव ठाकरे यांची भारतीय कामगार सेनेच्या सल्लागारपदी तर, अरविंद सावंत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सध्या कामगारांचे सरकार नाही. तर महाराष्ट्राचे काम गार करणार सरकार आहे. राज्यात आता उद्योग आहेत कुठे?, जे काही उद्योग येणार होते. ते ओरबाडून परराज्यात नेले आहेत. मी मुख्यमंत्री असताना २५हून अधिक उद्योग महाराष्ट्रात यावे, यासाठी करार केले होते. त्यापैकी काहींनी गुंतवणुकीस सुरूवातही केली होती. मात्र, पाठीत वार करून आपलं सरकार पाडलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

जोडे बनवणारी कंपनी महाराष्ट्रात येणार असा दावा उद्योगमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यामुळे दोन हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असा दावाही करण्यात आला होता. मात्र ती कंपनी देखील तामिळनाडूला गेली. जोडे बनवणारी कंपनीही गेली, आता बसलेत जोडे पुसत. जोडे पुसायची लायकी असणारी लोकं राज्य करत आहेत, अशा शब्दांतही ठाकरे यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बारसू रिफायनरीवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण पत्र लिहिलं होतं अशी कबुली यावेळी त्यांनी दिली. दरम्यान तेथील लोकांशी संवाद साधत, त्यांना रोजगार दिला जावा असंही ते म्हणाले. मी पत्र दिले होते, पण मी अडीच वर्षात पोलीस बळाचा वापर करून तिथे गेलो नाही. राज्याच्या मुळावर येणारे विषय मी थांबवून ठेवले होते. नाणार, बारसूची भूमिका माझी नाही, तर तिथल्या लोकांची भूमिका होती, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -