घरमहाराष्ट्र'राम मंदिराचा मुद्दा देखील चुनावी जुमला का?'

‘राम मंदिराचा मुद्दा देखील चुनावी जुमला का?’

Subscribe

आजपासून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरूवात केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्यावर टीकास्त्र डागले. तुम्ही निवडून आल्यापासून काय केलेत? असा सवाल उद्धव यांनी केला. दोनच दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये आले होते. त्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. तुम्ही पुन्हा सत्ता मागता, पण आत्तापर्यंत तुम्ही काय केलेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. शिवाय, जनतेची कामं करून घेण्यासाठी आम्ही अद्याप सत्तेमध्ये आहोत. असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर केव्हा बांधणार? असा सवाल देखील सरकारला केला. तसेच शिवसेनेला सत्तेची लालसा नसून आम्ही स्वाभिमान गहाण टाकलेला नाही. तर, शिवसैनिकांनी महाराष्ट्रावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहावे असे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेत.

वाचा – शिर्डीत येऊनही पंतप्रधान खोटे बोलल्याचे दुःख – खा. अशोक चव्हाण

राम मंदिराच्या मुद्याला हात

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपला लक्ष्य केले. आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट चुनावी जुमला आहे असे सांगितले. मग आता देखील राम मंदिराचा मुद्दा चुनावी जुमला आहे हे मान्य करा अशा शब्दामध्ये भाजपला लक्ष्य केले. राम मंदिर बनायेंगे, लेकिन तारीख नही बतायेंगे असा चिमटा देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला काढला. दरम्यान निवडूण आल्यानंतर भाजपला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले. त्यानंतर देखील पुन्हा सत्ता काय मागता? दिलेल्या आश्वासनांचं काय? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. शिर्डीनंतर उद्धव ठाकरेंची अहमदनगर येथे सभा होणार आहे.

- Advertisement -

वाचा – राम मंदिर बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टाला हे करावे लागणार

हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात

सर्व समाज सध्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. पण जातीच्या राजकारणात तुम्ही हिंदुत्व विसरू नका असे आवाहन उद्धाव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी लोकसभेमध्ये शिवसेना महाराष्ट्राबाहेर देखील उमेदवार उभे करण्याचा गांभीर्यानं विचार करत आहे. त्याच पार्श्वभूमिवर आता राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्याला शिवसेनेने हात घातल्याचे पाहायाला मिळत आहे.

शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी जाहीर

शिर्डीच्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे. लोकसभेसह,विधानसभेच्या निवडणुका देखील स्वबळावर लढवण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्याच पार्श्वभूमिवर सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण आता सर्वाचं लक्ष्य आहे ते शिवसेना स्वबळाचा निर्णय केव्हा जाहीर करणार याकडे.

- Advertisement -

वाचा – राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा

वाचा – ‘राम मंदिर सोडा, आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा’

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -