घरक्राइममोठी बातमी : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे पोलिसांच्या ताब्यात

मोठी बातमी : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शिक्षक भरती प्रकरणी अद्वय हिरे यांच्यावर मालेगावात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्ररकणी अद्वय हिरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवरही गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शिक्षक भरती प्रकरणी अद्वय हिरे यांच्यावर मालेगावात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्ररकणी अद्वय हिरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवरही गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. (uddhav thackeray shiv sena advay hire detained by nashik police in bhopal mp in renuka mill case malegaon)

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले आहे. अद्वय हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते. हे कर्ज न फेडल्याने 30 कोटींच्यावर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्वय हिरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांबद्दल राऊतांनी केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गटाकडून आंदोलन

उच्च न्यायालयाने अद्वय हिरे यांनी जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता. यावर्षी एप्रिल महिन्यात अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे 32 कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन आयेशा नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. बँकेची ही केस सुमारे आठ वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.

कोण आहेत अद्वय हिरे?

अद्वय हिरे यांचे मालेगावात मोठं काम आहे. ते भारतीय जनता पक्षात होते. त्यांनी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रातलं हिरे कुटुंब राजकारणातं मोठं कुटुंब आहे. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे हे फार मोठी परंपरा राजकारणात आहे. अद्वय हिरे हे तरुण पिढीचे नेते राजकारणात आहेत. ते भाजपतून शिवसेनेत आले.


हेही वाचा – “2024 मध्ये शरद पवारांचा पक्ष अजित पवारांना माती चारणार”, संजय राऊतांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -