घरमहाराष्ट्र..तर उद्या एक दोन नंबरचे उद्योगपतीही PM, CM होतील; उद्धव ठाकरे शिंदे...

..तर उद्या एक दोन नंबरचे उद्योगपतीही PM, CM होतील; उद्धव ठाकरे शिंदे गटावर पुन्हा बरसले

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर टीकास्त्र डागलं आहे. मी दुसरी शिवसेना मानत नाही, शिवसेना एकच आहे, एकच असणार आणि एकचं राहणार आहे, त्यामुळे दुसरी शिवसेना मानत नाही, असं ठणकावून सांगत, शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीबाबतही माहिती दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या सहा सात महिने शिवसेनचं काय होणार? शिवसेनेला पुन्हा धनुष्यबाण चिन्ह मिळणार की नाही? पुन्हा नाव मिळणार की नाही? तसेच ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे, त्यांनी शिवसेनेच्या पाठीत पोटात वार करून स्वत:चा हेतू साध्य करून टेंबा मिरवणारे त्यांचं काय होणार? कारण दोन विषय दिल्ली दरबारी आहेत. दिल्ली दरबारी म्हणजे दिल्लीत अनेक दरबार आहेत. यातील आपल्यासाठी दोन महत्वाची दरबारं आहेत ती म्हणजे एक सर्वोच्च न्यायालय आणि दुसरं निवडणुक आयोग, सर्वोच्च न्यायालाची सुनावणी येत्या 14 तारखेपासून सलग होणार आहे. आणि निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंनी वाद प्रतिवाद, दावे प्रतिदावे करण्यात आले आहेत. खोडाखोडी झाली… शेवटी निवडणुक आयोगाने गेल्या 30 तारखेला दोन्ही बाजूंना आपलं जे काही म्हणणं आहे ते लिखित स्वरुपात सादर करण्याचे आदेश दिले आहे, अशी महिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

- Advertisement -

मी दुसरी शिवसेना मानत नाही, शिवसेना एकच आहे, एकच असणार आणि एकचं राहणार आहे, त्यामुळे दुसरी शिवसेना मानत नाही. आम्ही आमचे जे काही मुद्दे होते ते निवडणुक आयुक्तांसमोर मांडले आहेत. लेखी स्वरुपातही दिले आहेत, असही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

मुद्दा स्पष्ट आहे कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होत असतो. त्याच हेतूने शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. पक्ष केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल तर उद्या जगातले कोणीही एक दोन नंबरचे उद्योगपतीही आमदार, खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतील. त्या पक्षाला काही अर्थ नाही त्याचा गद्दारी म्हणतात, असही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

- Advertisement -

पक्ष दोन पातळीवर असतो. एक वैधानिक म्हणजे विधिमंडळ, दुसरं संसदीय आणि त्यापलीकडचा मोठा पक्ष रस्त्यावरचा असतो. जो पक्ष आपला नेता, आपली घटना पाळतो. जी घटना शिवसेनेला आहे. शिवसेनेने निवडणुकी आयोगाच्या नियमाप्रमाणे घटना बनवली आहे. त्या घटनेनुसार निवडणुका होतात, असही उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळची निवडणूक 23 जानेवारीला होणं अपेक्षित होतं. ती निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केली आहे. एकतर ही निवडणूक आम्हाला घेण्याची परवानगी द्या. नाहीतर जे आहे तसंच चालू ठेवा. आयोगाकडून अजून तसं काही उत्तर आलेलं नाही. आयोगाच्या परवानगीनंतर रीतसर निवडणूक होईल. या घटनेनुसार शिवसेना पदाधिकारी आणि पद निर्माण केली गेली आहेत त्याच्या उल्लेख त्याच नमुद आहे, असही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.


आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलं नवं आव्हान, म्हणाले, येत्या अधिवेशनात….


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -