Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सावरकर आणि राहुल गांधी; उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा डाव

सावरकर आणि राहुल गांधी; उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा डाव

Subscribe

मुंबईः सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, हा राहुल गांधी यांना दिलेला इशारा उद्धव ठाकरेंच्या अंगलट आल्याचे चित्र तूर्त तरी दिसत आहे. भाजप व शिंदे गटाने या इशाऱ्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हिम्मत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा, असे थेट आवाहन उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे नौंटकी करत आहेत. त्यांना खरचं सावरकरांबाबत प्रेम असेल. आदर असेल तर त्यांनी कॉंग्रेसला सोडावं. कॉंग्रेस आणि राहुल गांधी रोज सावरकरांचा अपमान करत आहेत. मग दाखवा ना ठाकरी बाणा. सोडा कॉंग्रेसला. बाळासाहेबांनी ठाकरी बाणा दाखवला होता. तुम्हीही दाखवा ठाकरी बाणा. तुम्ही खुर्चीसाठी कॉंग्रेससोबत मांडली मांडी लावून बसला आहात. हिम्मत असेल तर सोडा कॉंग्रेसला. मी तुमचे अभिनंदन करेन. ते रोज अपमान करत आहेत. कशाला समजवता त्यांना. थेट बाहेर पडा, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

- Advertisement -

भाजपचे खासदार अनिल बोंडे म्हणाले, सावरकरांचा अपमान केल्यामुळे जनता कॉंग्रेसपासून दूर गेली आहे. त्यामुळे आपल्यापासूनही आता जनता दूर जात आहे याची उपरती उद्धव ठाकरे यांना झाली आहे. कॉंग्रेससोबत जाऊन आपण चूक केली हे त्यांच्या लक्षात आलं आहे. सावरकरांबद्दल बोलणाऱ्यांविरोधात बाळासाहेबांनी थेट भूमिका घेतली होती. सावरकरांबद्दल बोलणाऱ्यांना जोड्याने मारा, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. मग आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राहुल गांधी यांना जोड्यांनी मारणार का, असा सवाल खासदार बोंडे यांनी उपस्थित केला.

रामदास कदम म्हणाले, सावरकरांवरुन राहुल गांधी यांना इशारा दिलात. इतका स्वाभिमान असेल तर मग सोडा कॉंग्रेसला. करा ना एक घाव दोन तुकडे. हिम्मत असेल तर व्हा बाजूला कॉंग्रेसपासून. बाळासाहेबांचे पुत्र म्हणता ना स्वतःला मग कशाला घाबरता. बाहेर पडून दाखवा, असे आवाहन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचाः  सावरकरांचा अपमान सहन करणार नाही; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत काँग्रेस अन् राहुल गांधींना सुनावले

- Advertisment -