घरताज्या घडामोडीमुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे वारंवार शिंदेंना फोन करत होते... - नरेश म्हस्के

मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे वारंवार शिंदेंना फोन करत होते… – नरेश म्हस्के

Subscribe

‘एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केले. त्यावेळी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते’, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटाला शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केले. त्यावेळी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते’, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटाला शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘उद्धव ठाकरे सुद्धा माझे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंकडे गयावया करत होते, असे आम्ही बोललो तर, तुम्ही पटेल का? जेव्हा एकनाथ शिंदे सुरत आणि गुवाहटीला होते, त्यावेळी उद्धव ठाकरे सातत्याने एकनाथ शिंदे यांना फोन करत होते, आणि त्यांना मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी सांगत होते’, असे नरेश म्हस्के यांनी सांगितले. (Uddhav Thackeray was repeatedly calling Shinde to save the Chief Ministership says Naresh Mhaske)

नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंवर टीका केली. “राज्याचे मुख्यमंत्री कष्टकारी शेतकरी यांचे अश्रू पुसणारे आहेत. एकनाथ शिंदे हे मास लीडर आहेत. घरी मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे नाही आहेत. आम्ही रडणारे नसून रडवणारे आहोत”, असे नरेश म्हस्के म्हणाले.

- Advertisement -

“महाविकास आघाडीची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मिटींग होती. त्यावेळी सर्व वरीष्ठ नेत्यांना बाजूला ठेवून ते रडत होते. कारण नोटीस या लोकांना आली होती. नरेंद्र मोदी साहेबांकडे गयावया करत होती. आम्हाला कशाला नोटीस येणार आहे. आपली आपल्या नातेवाईकांची मित्रांची परदेशामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत? कुठे-कुठे गुंतवणूक करून ठेवली आहे? याच्या चिठ्ठ्या आमच्याकडे आहेत. आम्हाला या चिट्ठ्या उघड कराव्या लागतील”, असे नरेश म्हस्के म्हणाले.

“आदित्य ठाकरे यांची परिस्थिती संजय राऊत यांच्या सारखी झाली होती. संजय राऊतांना मानसिक आजार त्यांना झाला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना मानसोपचाराची गरज आहे. अचानक आमच्यावर हा नवा आरोप कसा आला? उद्धव ठाकरे सुद्धा माझे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंकडे गयावया करत होते, असे आम्ही बोललो तर, तुम्ही पटेल का? जेव्हा एकनाथ शिंदे सुरत आणि गुवाहटीला होते, त्यावेळी उद्धव ठाकरे सातत्याने एकनाथ शिंदे यांना फोन करत होते, आणि त्यांना मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी सांगत होते”, असेही नरेश म्हस्के म्हणाले.

- Advertisement -

“दिल्ली जसा पप्पू आहे, तसाच महाराष्ट्रातही पप्पू निर्माण झाला आहे. उंदीर बिळात लपून राहतो. त्याचप्रमाणे घरात कोण लपून राहिले होते, घरातून कोण बाहेर पडत नव्हते या सर्व हिंदुस्तानाला माहीत आहे”, अशा शब्दांत नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

संजय राऊत दुतोंडी गांडूळ – नरेश म्हस्के

“संजय राऊत हे दुतोंडी गांडूळ आहेत. संजय राऊतांचे एक तोंड मातोश्री कडे आणि दुसरं तोंड सिल्वर ओककडे असते. त्यामुळे ज्या प्रकारे संजय राऊत बोलत आहेत, त्या प्रकारे आम्हीही बोलू शकतो”, असा हल्लाबोल नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर केला.


हेही वाचा – ‘एकनाथ शिंदे रडले होते त्यांना…’, बंडावर आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -