घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे भूमिपूजनाला अयोध्येत जाणार नाहीत

उद्धव ठाकरे भूमिपूजनाला अयोध्येत जाणार नाहीत

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भूमिपूजनाला अयोध्येत जाणार नाहीत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. अयोध्येला जायला हे काही लग्नाचे निमंत्रण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंतरही जाऊन राम मंदिरात पूजा करतील. कोरोना परिस्थितीमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अयोध्येला जाणार नाहीत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी आधी ट्विट करून आणि नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या डायलॉगचा पुनरुच्चार केला. अभिनेते राजकुमार हे माझे आवडते अभिनेते आहेत. त्यांचे सिनेमे मी नेहमी पाहतो. आज सकाळीही त्यांचा सिनेमा पाहत होतो. त्यातील डॉयलॉग आवडला. काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांवर दगड मारू नये. काच फुटते. हमाम में सब नंगे होते है. त्यामुळे कुणी कुणावर बोट दाखवू नये. राजकारणात सर्वच जण काचेच्या घरात राहत असतात याचं भान ठेवलं पाहिजे, असं सांगतानाच अर्थात माझा हा रोख कुण्या पक्षावर नाही. समझनेवालों को इशारा काफी है, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे. जगभरात मुंबई पोलिसांचा नावलौकीक आहे. त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा. या प्रकरणावर मी अधिक बोलू शकत नाही. कारण मी सरकारचा भाग नाही. याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तच अधिक भाष्य करतील. मी बोलू शकत नाही, असं सांगतानाच या प्रकरणावर मी बोलावं अशी अजून वेळ आलेली नाही, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -