घरमहाराष्ट्रविषय गंभीर, अर्ध्यावर सोडू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना भावनिक आवाहन

विषय गंभीर, अर्ध्यावर सोडू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना भावनिक आवाहन

Subscribe

विषय गंभीर आहे. पण अर्ध्यात सोडू नका, असं भावनिक आवाहन आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. 

आपली सध्या दोन-तीन पातळ्यांवर लढाई सुरू आहे. रस्त्यावरील लढाई आपण लढू.कोर्टातही सुनावणी सुरू आहे. तिसरी लढाई म्हणजे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी आहे. विषय गंभीर आहे. पण अर्ध्यात सोडू नका, असं भावनिक आवाहन आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

हेही वाचा – सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी होणार उद्या, सर्वोच्च न्यायालयात आज काय झालं? वाचा एका क्लिकवर

- Advertisement -

आज एकीकडे सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर जळगावच्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यावरही टीका केली. राजकारणात विजय-पराभव होत असतो. पण आता संपवण्याची भाषा सुरू झाली आहे. अनेक आव्हानं पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे, असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचासुप्रीम कोर्ट सुनावणी: आम्ही पक्षातील नाराज सदस्य, हरिश साळवेंचा शिंदे गटाकडून युक्तीवाद

- Advertisement -

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. तसेच, पक्षाबाबतचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. तर, निवडणूक आयोगानेही दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यंत पक्षाबाबत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -