घरमहाराष्ट्रपुणेउदय सामंतांनी मार्ग बदलल्यामुळे झाला हल्ला!, पुणे पोलिसांचा दुजोरा

उदय सामंतांनी मार्ग बदलल्यामुळे झाला हल्ला!, पुणे पोलिसांचा दुजोरा

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या पुणे कात्रज येथे एकच वेळीच दौरा होता. या दौऱ्यावेळी बंडखोर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल (बुधवारी) शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यामुळे पुण्यात वातावरण प्रचंड तापले होते. यावेळी माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांच्या हातात हत्यारे होती, असे उदय सामंत यांनी म्हटले होते. हे हल्लेखोर माझ्या गाडीचा पाठलाग करत असावेत, असा संशयही उदय सामंत यांनी बोलून दाखवला होता. दरम्यान या प्रकरणात उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते नियोजित रस्ता सोडून दुसऱ्या मार्गाने गेल्यामुळे ते शिवसैनिकांच्या तावडीत सापडले. उदय सामंत हे ठरलेल्या रस्त्याने गेले नसल्याच्या वृत्ताला पुणे पोलिसांकडून दुजोरा मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा हडपसरवरून कात्रजकडे येत असताना मुख्यमंत्री तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देणार होते. यांच्या ताफ्यामध्ये शिंदे गटाचे आमदार उदय सामंत होते. मात्र, बिबवेवाडीच्या मार्गावर न जाता ते कात्रज कोंढवा रस्त्याने कात्रज चौकामध्ये आले. उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम आटोपून पुढे मुख्यमंत्र्यांचा ताफा सोडून पुढे निघाले होते. त्यावेळीच कात्रज चौकात त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला झाला. दरम्यान उदय सामंत यांच्यावर हल्ला करणाऱ्या पाच शिवसैनिकांना भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरेंचा एकाच वेळी दौरा-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या पुणे कात्रज येथे एकच वेळीच दौरा होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी जाणार होत आणि आदित्य ठाकरे यांची सभा कात्रज चौकात होणार होती ही सभा झाल्या नंतर उदय सामंत यांच्या ताफा कात्रज चौकात पोहचला. त्यावेळी जमलेल्या सभेतल्या लोकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा भ्याड हल्ला असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -