घरताज्या घडामोडीUP Election Result 2022 : विजय पचवायला शिकलं पाहिजे, पण...; संजय राऊतांचा...

UP Election Result 2022 : विजय पचवायला शिकलं पाहिजे, पण…; संजय राऊतांचा भाजपला टोला

Subscribe

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आघाडी घेतली असून बहुमताचा आखडा पार केला आहे. शिवसेना उत्तर प्रदेशात निवडणूक लढवत होती परंतु शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांनी दिलेला विजय पचवा, अजीर्ण झाल्यास त्रास होतो असे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. तसेच यूपीमध्ये भाजपच्या नोटांमुळे आम्हाला नोटापेक्षा कमी मत मिळाली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावरुन प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला चांगला विजय मिळाला आहे. राजकारणामध्ये ज्यांचा विजय होतो त्यांचे अभिनंदन करण्याची आपली परंपरा आहे. ज्या- राज्यात ज्या पक्षाचा विजय झाला आहे. त्यांचे अभिनंदन करतो. पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. समाजवादी पक्षापेक्षा काँग्रेस चांगले काम करेल अशी अपेक्षा होती परंतु काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी झाली असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

विजय पचवायला शिकलं पाहिजे

उत्तर प्रदेशात भाजपच्या नोटांमुळे आम्हाला नोटापेक्षा कमी मतं मिळाली आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर भाजपला मोठा विजय मिळाला आहे. परंतु पराभव पचवणं अनेकदा सोप असतं पण काही लोकांना विजय पचवता येत नाही. यामुळे मतदारांनी जो विजय दिला आहे. तो विजय पचवा नाहीतर सूडाने राजकारण न करता लोकशाही मार्गाने काम करा, इतकच सांगतो असे संजय राऊत म्हणाले आहेत.

अखिलेश यांनी काँग्रेसला सोबत घेतलं असत तर…

समाजवादी पार्टीने चांगली कामगिरी दिली आहे. अखिलेश यादव यांनी काँग्रेसला सोबत नेलं असते तर चांगला परिणाम दिसला असता. काँग्रेसने आता आपल्या धरणामध्ये बदल केला पाहिजे. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा एकत्र लढण्याचा प्रयत्न केला. तसे झाले असते तर नक्की फायदा झाला असता असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : UP Election Result Analysis: यूपीमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललं, ‘या’ सहा फॅक्टरचा मोठा फायदा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -