घरठाणेऑनलाईन मतदार नोंदणीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर, भिवंडी आणि बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा...

ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर, भिवंडी आणि बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Subscribe

ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत बोगस कागदपत्र जोडल्याचे आढळून आल्याने ठाणे जिल्ह्यातील १३७-भिवंडी पूर्व आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रभारी निवडणूक नायब तहसिलदार यांनी संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ६ जणांविरुध्द तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळविली आहे.

१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांसोबत बनावट कागदपत्रे जोडल्याचे निर्दशनास आल्याने १३७-भिवंडी पूर्व मतदारसंघाचे प्रभारी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी यांनी भिवंडीच्या शांतीनगर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारे सीबीडी बेलापूर येथील पोलीस ठाण्यात २२ जणांविरुध्द १५१ -बेलापूर मतदारसंघाचे प्रभारी नायब तहसिलदार राजश्री पेडणेकर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का, हिटमॅनच्या हाताला गंभीर दुखापत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -