घरमहाराष्ट्रVanchit Aghadi- Republican : एकत्र आल्यास महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलू शकतो - रामदास आठवले

Vanchit Aghadi- Republican : एकत्र आल्यास महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलू शकतो – रामदास आठवले

Subscribe

अँड. प्रकाश आंबेडकर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून त्यांचा मला आदर आहे. अकोला जिल्हा पुन्हा रिपब्लिकनमय करायया आहे. दलित पँथरच्या माध्यमातून अकोला जिल्हयात अनेक आंदोलने करण्यात आली होती.

अकोला :  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर आणि माझ्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही एकत्र आलो तर महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलू शकतो आणि, अशी इच्छा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दोन्ही एकत्र येवून राज्यात आपला मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असेही रामदास आठवले म्हणाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अकोला जिल्हयाच्या वतीने अकोला शहरातील डाँ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाटयगृहात आयोजित गायरान जमीन अतिक्रमण हक्क परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामदास आठवले बोलत होते.

अँड. प्रकाश आंबेडकर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून त्यांचा मला आदर आहे. अकोला जिल्हा पुन्हा रिपब्लिकनमय करायया आहे. दलित पँथरच्या माध्यमातून अकोला जिल्हयात अनेक आंदोलने करण्यात आली होती. आम्हाला पुन्हा हा जिल्हा रिपब्लिकनमय करायचा आहे, असा निर्धार रामदास आठवले यांनी यावेळी बोलून दाखविला.

- Advertisement -

हेही वाचा – Ram Mandir : सपा नेत्याकडून कारसेवकांवरील गोळीबाराचे समर्थन; प्राणप्रतिष्ठेपूर्वी नव्या वादाला फुटणार तोंड?

रिपाइं (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गायरान जमीन अतिक्रमण हक्क परिषदेला पक्षाचे प्रदेश सहसंघटन सचिव अशोक नागदेवे, सुमित वजाळे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष मोहन भोयर, जिल्हा महासचिव जे.पी.सावंत, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रकाश बनसोड, महेंद्र मानकर प्रकाश गजभिये, बुध्दभूषण गोपनारायण ;अर्चना धांडे; आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आकाश हिवराळे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -