घरताज्या घडामोडीVasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला, आता...; वसंत मोरेंचा फेसबूक पोस्टमधून...

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला, आता…; वसंत मोरेंचा फेसबूक पोस्टमधून इशारा, पण रोख कोणावर?

Subscribe

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी निष्ठावंत असलेले नेते वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. वसंत मोरे यांनी मध्यरात्री 12 वाजता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लिहिलेल्या मजकुरावरून सध्या वसंत मोरे चर्चेत आले आहेत.

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी निष्ठावंत असलेले नेते वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. वसंत मोरे यांनी मध्यरात्री 12 वाजता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लिहिलेल्या मजकुरावरून सध्या वसंत मोरे चर्चेत आले आहेत. तसेच मोरे यांच्या फेसबूक पोस्टमुळे वसंत मोरे आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठांचे सर्वकाही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. (vasant more facebook post pune mns leader social media raj thackeray lok sabha election)

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबूकवर मंगळवारी रात्री एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये “एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही”, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे पक्षांतर्गत संघर्षामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेला आता वसंत मोरे यांच्या पोस्टमधून पाठबळ मिळत असल्याचे बोललं जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, तात्याचा हातोडा म्हणून पुण्यात वसंत मोरे यांचा दबदबा आहे. पुण्यातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायावर हातोडा मारत त्यांना न्याय मिळवून देणारा नेता म्हणजे वसंत मोरे अशी त्यांची खासियत आहे. पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. त्याचबरोबर शहरामध्ये मनसेची वाढ करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. वसंत मोरे यांची तरूणांमध्येही एक प्रकारची क्रेझ असल्याचं दिसून येते.

- Advertisement -

एकिकडे पक्षवाढीसाठी काम करत असताना सातत्याने पक्षांतर्गत संघर्षाचा सामना करावा लागत असल्याने वसंत मोरे यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी वसंत मोरे यांच पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करत साईनाथ बाबर यांच्यावर या पदाची धुरा सोपवण्यात आली. तेव्हाही वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसेच्या भोंग्यांविरोधातील भूमिकेवरही वसंत मोरे नाराज होते. कारण त्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक मुस्लीम बांधव आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक असून त्यांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच त्या बैठकीत वसंत मोरे पोहोचल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या.


हेही वाचा – CAA : सुधारित नागरिकत्व कायद्याची अधिसूचना जारी, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -