घरताज्या घडामोडीज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं राहत्या घरी निधन

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं राहत्या घरी निधन

Subscribe

साहित्य विश्वातून एक दुःख बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी मिरासदार यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मराठी साहित्य विश्वातील विनोद लेखनाची परंपरा द.मा. मिरासदार यांनी पुढे आखणीन वाढवली. विनोदी लेखनीसह तेवढ्याच खुमासदार पद्धतीने कथाकथन करण्यासाठी ते ओळखले गेले. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रिकुटाचं कथाकथन मराठी जनांसाठी आवडीचं केंद्र असायचं. द.मा. मिरासदार यांचं कथाकथन संपूर्ण महाराष्ट्राभर तर होतंच असायचं. परंतु महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही द.मा. मिरासदार यांनी कथाकथन केलं आहे. पुण्यातील सहकार नगर मधील राहत्या घरी आज द.मा मिरासदार यांनी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९५व्या वर्षी मिरासदार यांचं निधन झालं.

- Advertisement -

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनांची परंपरा मिरासदार यांनी पुढे सुरू ठेवली होती. शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाचे आणि उत्तम सादरीकरणामुळे श्रोत्यांच्या मनात कायम कोरल्या गेल्या आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही मिरासदार यांनी वढवली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा विंदा जीवनगौरव पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मीकी पुरस्कार आणि पु.ल.जीवनगौरव सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी मिरासदारांना गौरवण्यात आलं आहे.

द. मा.म्हणजे ग्रामीण विनोदाची मिरासदारी

- Advertisement -

मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगत आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची ‘मिरासदारी’ अबाधित राहिलं. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

द. मा. म्हणजेच दादासाहेबांनी मराठी साहित्यात आपल्या नावाप्रमाणेच मिरासदारी निर्माण केली. मराठीत ग्रामीण जीवनातील पार, कट्ट्यावरचा आणि अशा अनेक इरसाल नमुन्यांचा विनोदी खजिन्याचा पेटाराच दादासाहेबांनी उघडला. विनोदी लेखन, कथाकथन यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवले. कथाकथनातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेला, असे ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

दादासाहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही गेले. ते उभे राहायचे, खर्जातील आवाजात कथा रंगवून सांगू लागले की त्या गावातले नमुने आरसा दाखवल्याप्रमाणे खळखळून हसू लागायचे. विलक्षण निरिक्षण शक्ती आणि लेखन-सादरीकरणातील निर्भेळपणा यामुळे मिरासदार यांनी आपली अशी ‘मिरासदारी’ निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्याने अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -