घरमहाराष्ट्र'चित्रा वाघ यांनी बोलताना भान राखावं'; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

‘चित्रा वाघ यांनी बोलताना भान राखावं’; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

Subscribe

दरम्यान या सगळ्या प्रकरणावर म्हणजेच चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण निशाणा साधत म्हणाल्या, 'स्त्री - पुरुष एकमेकांना संमतीने भेटत असतील, तर त्या विषयी त्यांनी असं जाहीरपणे बोलणं चुकीचं आहे.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय गदारोळ सुरु असतानाच राजकीय नेतेमंडळी सुद्धा एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांचा एक फोटो आणि व्हिडीओ ट्विट केले होते. आणि सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली होती. त्यांनतर नाना पटोलेंनी याविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. यावरूनच नाना पटोले म्हणाले, ‘राजकारणातली पातळी खालावत आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना कसं बदनाम करता येईल त्या बद्दलची प्रक्रिया सुरु आहे. आमचं लीगल सेल यासंदर्भात कारवाई करेल, आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे नाना पटोले यांनी संगीतले.

हे ही वाचा –  नाना पटोलेंचा रोमान्स इन चेरापुंजी, चित्रा वाघ यांच्याकडून व्हिडीओ ट्वीट

- Advertisement -

दरम्यान या सगळ्या प्रकरणावर म्हणजेच चित्रा वाघ(chitra wagh) यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण निशाणा साधत म्हणाल्या, ‘स्त्री – पुरुष एकमेकांना संमतीने भेटत असतील, तर त्या विषयी त्यांनी असं जाहीरपणे बोलणं चुकीचं आहे. तुमच्या पक्षात आले की सगळे पवित्र होतात आणि बाकीच्या पक्षांना टार्गेट करतात आणि त्यासाठी पत्रकार परिषद घेऊन अशाप्रकारे आरोप करणं चुकीचं आहे. असं विद्या चव्हाण(vidya chavan) म्हणाल्या.

हे ही वाचा – अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काँग्रेसचा राज्य सरकारकडे पाठपुरावा

- Advertisement -

याच संदर्भात विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या, तुम्ही धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ आहे का? असा थेट सवालही विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर चित्रा वाघ यांनी भान राखावं, त्यांना भान राहिलेलं नाही. भाजपकडून काही तरी मिळावं यासाठी चित्रा वाघ बेचैन झाल्या आहेत, असा खोचक टोलाही विद्या चव्हाण(vidya chavan) यांनी लगावला.

दरम्यान चित्रा वाघ(chitra wagh) यांनी व्हिडीओ पोस्ट करत त्याला कॅप्शन सुद्धा दिले होते. चित्रा वाघ यांची पोस्ट सर्वाधिक चर्चेत सुद्धा होती आणि यावरूनच राजकीय वर्तुळात नेतेमंडळींची एकमेकांविरोधात टोलेबाजी सुरु झाली.

हे ही वाचा –  महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, चित्रा वाघ यांचा…

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -