घरमहाराष्ट्रविरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार नाही - विखे पाटील

विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार नाही – विखे पाटील

Subscribe

काँग्रेसचे वरिष्ठ नेते विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता विखे पाटील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा सध्या सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजपमधील प्रवेशानंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे. सुजय पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आता विखे पाटील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून मी विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही’, असं विखे पाटील म्हणाले आहेत. त्याचबरोबर ‘पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन’, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेनेची ऑफर

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर विखे पाटील यांना शिवसेनेची ऑफर आली आहे. त्यामुळे विखे पाटील विरोध पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. विखे पाटील म्हणाले की, ‘माझी भूमिका मी पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून सांगितली आहे. मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून लगेच पदाचा राजीनामा देणार नाही. पक्ष सांगेल ती जबाबदारी मी पार पाडणार आहे.’ त्याचबरोबर ‘सुजय यांना काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा नव्हती. म्हणून नाईलाजास्तव त्यांनी हा निर्णय घेतला. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे’, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -