घरमहाराष्ट्रविलासराव देशमुखांच्या मेहुण्याने काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ घेतले हाती

विलासराव देशमुखांच्या मेहुण्याने काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ घेतले हाती

Subscribe

राजेश देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

आगामी लोगसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गळती सुरुच आहे. काँग्रेसला बीडमध्ये धक्का बसला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मेहुण्याने काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हातात घेतले आहे. राजेश देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राजेश देशमुख हे काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणी आणि वेद्यनाथ देवल कमिटीचे सचिव आहेत. ऐन निवडणूक काळात त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे बीडमध्ये राजकीय चर्चेंना उधाण आले आहे. राजेश देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे. दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून प्रितम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आघाडीकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -