घरमहाराष्ट्रWar aganist Corona : कोरोना विरोधी लढाईत ११ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम करतेय...

War aganist Corona : कोरोना विरोधी लढाईत ११ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम करतेय ठाकरे सरकारचे नेतृत्व

Subscribe

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मोठ्या धैर्याने समोरा जात आहे. यात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यामुळे राज्यातील कोरोना विरोधी लढाई जिंकण्यासाठी ११ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ठाकरे सरकारचे नेतृत्व करत आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून राज्यातील ही ११ डॉक्टरांची टीम कोरोनाला हरवण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. या ११ तज्ज्ञ डॉक्टरांची फौज राज्यातील इतर डॉक्टरांची मदत करत आहे. राज्यातील विविध रुग्णलायातील डॉक्टरांना कोरोनाच्या गंभीर किंवा सामान्य रुग्णांवर उपचारांदरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या ११ तज्ज्ञ डॉक्टर हेल्पलाईन नंबर राज्य सरकारने जाहीर केले आहेत. या नंबरच्या साहाय्याने राज्यातील इतर डॉक्टर दिवस रात्र कधीही यातील कोणताही नंबरवर कॉल किंवा मेसेज करुन तज्ज्ञ डॉक्टरांचा त्वरीत सल्ला घेऊ शकतात.

हे ११ तज्ज्ञ डॉक्टर मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालयांमधील सर्वात अनुभवी डॉक्टरांपैकी एक आहेत. दरम्यान राज्यात एप्रिल २०२० पासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ठाकरे सरकाराने या ११ डॉक्टरांची टास्क फोर्स समिती नेमली. या समितीमार्फत राज्यातील कोरोनाच्या वाढता कोविड मृत्यू दर कमी करत कोरोना चाचणी वाढवणे आणि कोरोनावर उपचार करण्यासाठी प्रोटोकॉल तयार करण्यात आला.

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णांसाठी लागणारा ऑक्सिजन पुरवठ्यापासून ते रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार कमी करत कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका डॉक्टरांचा टाक्सफोर्स समितीने घेतल्या आहेत. तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आठवड्यातून एकदा महत्त्वपूर्ण बैठक घेत राज्य सरकारला महत्त्वपूर्ण सुचना दिल्या जात आहेत.

याशिवाय टास्क फोर्स जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत आवश्यकतेनुसार रूग्णांवर उपचार करणार्‍या आरोग्यसेवांना मार्गदर्शन करतात. यावर रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी निधी चौधरी सांगतात, अनेकदा मी कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी टास्क फोर्सशी संपर्क साधला त्यावेळी टास्क फोर्समधील सदस्यांनी मला त्वरीत प्रतिसाद दिला आहे. काही डॉक्टर उपचारानंतर स्टिरॉइड्स लिहून देत होते म्हणून मी यासंदर्भातील सल्ला घेण्यासाठी टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचाशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी तातडीने प्रतिसाद देत रुग्णाचा इतिहास, लक्षणे इत्यादींबद्दल माहिती जाणून घेत योग्य सल्ला दिला. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरही वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टास्क फोर्सशी संपर्क साधतात. दरम्यान राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात टास्क फोर्सची मोठे मदत आहे. कारण रुग्णावर प्रोटोकॉनुसार उपचार करणे तसेच सहा मिनिटे चालण्याची चाचणी, रुग्णाचा शरीरातील ऑक्सिजन पातळीवर नजर ठेवत उपचारांचा मार्ग अवलंबने, घराघरात जाऊन तपासणी असे अनेक यशस्वी प्रयोग टास्क फोर्सने राबवले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राचे स्पेशल ११

या टास्कफोर्समध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी खासगी तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ अनुभवी डॉक्टर आहेत. या टास्कफोर्सचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आहेत. तर या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक असून ते गेल्या नोव्हेंबरपर्यंत प्रीन्स एली खान रुग्णालयात मुख्य कार्यकारी डॉक्टर होते. तसेच त्यांनी किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलचे डीन पद सांभाळले असून गेली २३ वर्षे त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) मध्ये काम केले. केईएम हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण बांगर हे टास्कफोर्सचे संयोजक आहेत.

फोर्टीस रूग्णालयात अतिदक्षता विभागाचे डॉ. राहुल पंडित पीडी हिंदुजा नॅशनल हॉस्पिटलमधील आपातकालीन औषध विभागाचे प्रमुख डॉ. खुसराव बजन, संचालित किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलचे डीन केदार तोरस्कर, शीव रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉ. नितीन कर्णिक हे सर्व टास्कफोर्समधील महत्त्वाचे सदस्य आहेत तर

या टास्कफोर्समध्ये जसलोक रुग्णालयाचे संसर्गजन्य रोगांचे तज्ञ डॉ ओम श्रीवास्तव आणि औषध तज्ज्ञ डॉ वसंत नागवेकर यांचाही सहभाग आहे. तसेच लीलावती रुग्णालयातील मधुमेह आणि अंतःस्रावी तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी, हिंदुजा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व ब्रेच कँडी हॉस्पिटलमधील छातीसंबंधीत आजारांचे तज्ज्ञ डॉ. डझारिर उडवाडिया व आणि प्रिन्स एली खान हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. जहीर विरानी यांचाही समावेश आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -