घरमहाराष्ट्रवर्ध्यात संचारबंदी लागू, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद

वर्ध्यात संचारबंदी लागू, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद

Subscribe

जिल्ह्यात ११२६ नव्या रुग्णांची भर

महाराष्ट्रात कोरोनास्थिती चिंताजनक होत असतानाच वर्ध्या जिल्ह्यातही सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. याचपार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवार रात्री आठ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे वर्ध्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या १० दिवसांत वर्ध्यामध्ये ११२६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यातही वर्ध्यामध्ये शनिवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर वर्धा पून्हा कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्या पून्हा तीन दिवसांसाठी लॉकडाऊन होणार आहे.या कालावधीत वर्ध्यातील वैद्यकीय सेवा वगळता दुकाने, मॉल्स, मार्केट बंद राहणार आहेत. तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स, खासगी, एसटी, ऑटोरिक्षा सेवा बंद राहील. त्याशिवाय जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू राहील. याआधी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत वर्धा जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालय बंद करण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

या सर्व नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी वर्ध्यात एकावेळी 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली होती. यानंतर आता वर्ध्यात थेट संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत 8333 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4936 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2017303 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 67608 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.35% झाले आहे. त्यामुळे देशातील एकंदरीत वाढती रुग्णसंख्या लक्षात आज केंद्रातील कॅबिनटे सेक्रेटरी आठ राज्यांची बैठक घेणार आहे. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, तेलंगना आणि पश्चिम बंगाल या राज्यांशी चर्चा होणार आहे. कारण या आठ राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -