घरमहाराष्ट्रपुणेबाळासाहेब थोरातांना सावध केले होते, पण... नाशिक निवडणुकीवरून अजित पवारांचा दावा

बाळासाहेब थोरातांना सावध केले होते, पण… नाशिक निवडणुकीवरून अजित पवारांचा दावा

Subscribe

पुणे : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी या महिन्याच्या अखेरीस निवडणूक होत आहे. पण त्यात सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती, नाशिकच्या जागेची. या जागेसाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली. पण प्रत्यक्षात सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने याला नाट्यमय कलाटणी मिळाली. यासंदर्भात सत्यजित तांबे यांचे मामा आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना आधीच सावध केले होते; पण असे काही होणार नाही, असे त्यांनी आश्वस्त केले होते, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

विधान परिषद निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. त्यानुसार जागावाटपही करण्यात आले. त्यानुसार नागपूरची जागा शिवसेना, कोकणातील जागा शेकाप, औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस आणि नाशिक व अमरावतीची जागा काँग्रेस लढवणार होती. पण नाशिकच्या बाबतीत नाट्यमय घडामोड घडली आणि सुधीर तांबेंऐवजी त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. यामागे भाजपाची खेळी असल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शुक्रवारी हा दावा केला आहे. ‘गेले दोन-तीन दिवस कानावर काहीतरी वेगळे येत होते. तेव्हा मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो. त्यावर, तुम्ही काळजी करू नका. आमच्या पक्षाची जबाबदारी आम्ही आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू. उद्या डॉ. सुधीर तांबे यांचाच फॉर्म येईल, असे बाळासाहेब थोरातांनी म्हटले होते, असे अजित पवार सांगितले. म्हणजेच, आपण दिलेला सावधगिरीचा इशारा काँग्रेसने गांभीर्याने घेतला नाही, असाच सूर त्यांच्या या दाव्यामागे दिसतो.

सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही
आम्ही पक्षाकडून डॉ, सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पण डॉ. सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली. आपल्या मुलाचा अपक्ष फॉर्म भरून भाजपाचा पाठिंबा असल्याचे दर्शवले. कारण तांबे यांनी सांगितले की, आम्ही भाजपाचा पाठिंबा घेणार हे एकप्रकारे काँग्रेसला धोका दिल्यासारखे आहे. त्यामुळे याबाबत हायकमांडला माहिती देण्यात आली आहे. यावर हायकमांड निर्णय घेणार असून, त्यांच्या निर्णयानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू. परंतु, बडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -