Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र सरन्यायाधीश म्हणाले, आम्हाला वाटतं नाही ठाकरे गट शिंदे गटाची मदत घेईल; पुढील...

सरन्यायाधीश म्हणाले, आम्हाला वाटतं नाही ठाकरे गट शिंदे गटाची मदत घेईल; पुढील सुनावणी १६ मार्चला

Subscribe

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पाच न्यायाधीश घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. गुरुवारी शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील निरज कौल यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी शिंदे गटाच्यावतीने बाजू मांडण्यास सुरुवात केली. सत्ताबदलाचा संपूर्ण तपशील ज्येष्ठ वकील साळवे यांनी न्यायालयासमोर मांडला. महाराष्ट्रात सत्ता बदल होत असताना गोष्टी एवढ्या वेगाने घडत होत्या की काय होणार याचा कोणालाच अंदाज नव्हता, असे ज्येष्ठ वकील साळवे यांनी न्यायालयाला सांगितले.

नवी दिल्लीः आम्हाला वाटतं नाही ठाकरे गट न्यायालयात शिंदे गटाची मदत घेईल, अशी मिश्किल टिप्पणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी गुरुवारी केली. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल व मनू सिंघवी यांना शिंदे गटाच्या वकीलांची मदत मिळाली तर त्यांना आनंदच होईल. पण आम्हाला वाटतं नाही ते न्यायालयात शिंदे गटाच्या वकीलांची मदत घेतील, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केले. यावरील पुढील सुनावणी १६ मार्चला होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. गुरुवारी शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील निरज कौल यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी शिंदे गटाच्यावतीने बाजू मांडण्यास सुरुवात केली. सत्ताबदलाचा संपूर्ण तपशील ज्येष्ठ वकील साळवे यांनी न्यायालयासमोर मांडला. महाराष्ट्रात सत्ता बदल होत असताना गोष्टी एवढ्या वेगाने घडत होत्या की काय होणार याचा कोणालाच अंदाज नव्हता, असे ज्येष्ठ वकील साळवे यांनी न्यायालयाला सांगितले.

- Advertisement -

ज्येष्ठ वकील साळवे यांचा युक्तिवाद सुरु असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यासंदर्भात वकीलांशी चर्चा केली. साळवे यांनी पुढच्या सुनावणीत पाच मिनिटे युक्तिवाद करावा. त्यानंतर शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी युक्तिवाद करतील. त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर सॉलिसिटर जनरल यांची बाजू आम्ही ऐकू. सॉलिसिटर जनरल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर मग आम्हाला सिब्बल यांना प्रत्त्युतर सादर करण्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे. त्यासाठी सिब्बल व सिंघवी यांना शिंदे गटाच्या वकीलांशी याबाबत बोलावे लागेल. पण आम्हाला वाटतं नाही ते शिंदे गटाच्या वकीलांची न्यायालयात मदत घेतली, अशी टिप्पणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने यावरील पुढील सुनावणी १६ मार्चला होणार असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यांच्या बंडाला शिवसेनेच्या ३९ आमदारांची साथ मिळाली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले व शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. या सत्ता बदलात १६ आमदारांना पाठवलेली अपात्रतेची नोटीस. विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव यासह अनेक मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -