घरमहाराष्ट्रपुढच्या वर्षीही दहिहंडी खेळणार, साहसी बालगोविंदांचा निर्धार

पुढच्या वर्षीही दहिहंडी खेळणार, साहसी बालगोविंदांचा निर्धार

Subscribe

मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई अशा अनेक भागांमध्ये सोमवार सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत होता. मात्र, एकीकडे दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत असताना दुसरीकडे काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याचं दिसून आले आहे. जवळपास २१९ हून अधिक गोंविदा जखमी झाले आहेत. तरी देखील पुढच्या वर्षी गोविंदा खेळणार असल्याचा निर्धार साहसी बालगोविंदांने केला आहे.

मुंबईसह संपूर्ण देशात मंगळवारी दहिहंडीचा थरार अनुभवायला मिळाला. सकाळपासून दहिहंडीच्या उत्साहाला उधाण आलं होतं. एकीकडे उत्साहाचं वातावरण असताना दुसरीकडे मात्र मुंबईत एका गोविंदाच्या मृत्यूमुळे सणाला गालबोट लागलं. त्यासोबतच जवळपास २१९ हून अधिक गोंविदा जखमी झाले आहेत. त्यात बालगोविंदांचा ही समावेश आहे. पण, पुढच्या वर्षीही याच उत्साहाने दहिहंडी खेळणार असल्याचा निर्धार बालगोविंदाचा आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात जवळपास २१९ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी २५ जणांवर अजूनही वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, बाकीच्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

खापरी देवी क्रिडा मंडळ

१४ वर्षीय पियुष श्रीधर गुप्ता हा बालगोविंदा सहाव्या थरावरुन त्याच्या साथीदारांच्या अंगावर कोसळला आणि त्यानंतर जमिनीवर आदळला. या घटनेत त्यांच्या छातीवर जबर मार बसला असून त्याच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एलफिन्स्टनच्याच खापरी देवी क्रिडा मंडळ या पथकातील हा बालगोविंदा असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

चार गोविंदांवर उपचार सुरु

केईएम रुग्णालयात एकूण ९ जखमी गोविंदावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, चौघांवर उपचार सुरू आहेत. या चौघांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना ही लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल.

piyush gupta
पियुष गुप्ता, बालगोविंदा, खापरी देवी क्रिडा मंडळ

सुरक्षेसाठी काहीच तयारी नव्हती

मी सहाव्या थरावर म्हणजेच एकदम वरच्या थरावर होतो. माझा तोल गेल्यामुळे मी खालच्या थरावर असणाऱ्या गोविंदारांवर पडलो. परंतु ते ही पडल्यामुळे आमचा संपूर्ण थर खाली कोसळलो. त्यात मी खाली पडलो आणि माझ्या छातीला देखील लागलं आहे. आम्ही जवळपास १ महिन्यांपासून तयारी करत होतो. आमच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी कसल्याच प्रकराची तयारी केली नव्हती. असे असले तरी देखील मी पुढच्या वर्षीही दहिहंडी खेळणार आहे.

- Advertisement -

पियुष गुप्ता, बालगोविंदा, खापरी देवी क्रिडा मंडळ , एलफिन्स्टन

aniket parmar
अनिकेत परमार,ओम साई मित्र मंडळ

ओम साई मित्र मंडळ

पियुष सोबत आणखी एका बालगोविंदावर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. १८ वर्षीय अनिकेत परमार असं या गोविंदाचं नाव आहे. या गोविंदाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ओम साई मित्र मंडळ या पथकासोबत तो ठाण्यात दहिहंडीसाठी गेला होता. ६ व्या थरावर चढला असताना तो थरावरुन खाली कोसळला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कुठल्याच प्रकारची उपाययोजना केली नसल्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार बसला आहे.

– अनिकेत परमार, ओम साई मित्र मंडळ

आमचं पथक छोटं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कसलीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. पण, बाकी अनेक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

– राजू चंद्रकांत पाटकर, साहसी बालगोविंदा पथकाचे समन्वयक

vinod tawde
विनोद तावडेंनी घेतली जखमी गोविंदांची भेट

विनोद तावडेंनी घेतली जखमी गोविंदांची भेट

क्रिडा मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी केईएममध्ये दाखल असलेल्या गोविंदांची भेट घेतली. यावेळी सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याचं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय, गेल्या १० वर्षापेक्षा यंदा गंभीर गोविंदांची संख्या खूप कमी आहे. याचा अर्थ गोविंदा पथक आणि आयोजकांनी मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्याचं स्पष्ट झालं असल्याचं ही तावडे यांनी सांगितलं.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -