घरमहाराष्ट्रपुणेWeather Update : पुणेकरांना उकाड्यापासून मिळणार दिलासा, तपमानात होणार घट

Weather Update : पुणेकरांना उकाड्यापासून मिळणार दिलासा, तपमानात होणार घट

Subscribe

पुणे : हिवाळ्यातही पुणेकरांना उन्हाळ्याच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ज्यामुळे पुणेकर वैतागले आहेत. पण भारतीय हवामान विभागाने पुणेकरांसाठी आनंदाची बातमी दिली असून लवकरच पुण्याच्या तपमानात घट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवस पुण्यातील तपमानातील ही घट कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. आज (ता. 23 फेब्रुवारी) पुण्यात हवमान खात्याकडून 11.7 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली आहे. (Weather Update: Pune residents will get relief from the heat, there will be a drop in temperature)

हेही वाचा… Navi Mumbai Bus Service: उरणला जाणारी बससेवा बंद; ‘या’ कारणामुळे NMTT ने घेतला निर्णय

- Advertisement -

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये पुण्यात आकाश निरभ्र राहील आणि उत्तरेकडील वारे पुणे आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात प्रवेश करतील. यामुळे तपमानात काही प्रमाणात घट होईल. पुण्यातील तपमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होऊन ते 10 अंश सेल्सिअस किंवा त्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वात कमी तापमानातील ही शेवटची घसरण असू शकते, असेही सांगण्यात आले आहे.

तर, गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तपमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी 18 फेब्रुवारीला शिवाजीनगर येथे 15.5 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात होती. 20 फेब्रुवारीला ते 13 अंशांपर्यंत घसरले. गेल्या चोवीस तासात एक अंश सेल्सिअसने घसरलेल्या कमाल तपमानातही काहीशी घट झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात कमी तपमान काही ठिकाणी 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. हवेली तालुक्यात किमान तपमान 10.9 अंश सेल्सिअस, शिरूर आणि एनडीए भागात 11.1अंश सेल्सिअस होते.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांमध्ये हवामानात अनेक बदल होत असल्याचे पाहायला मिळत असून पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर कोकणातही काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याशिवाय 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातील अकोला आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, पुण्यात तसे कोरडे हवामान पाहायला मिळेल, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -