घरताज्या घडामोडीपश्चिम रेल्वेच्या 30 अतिरिक्त फेस्टिव्हल ट्रेन; 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार आरक्षण

पश्चिम रेल्वेच्या 30 अतिरिक्त फेस्टिव्हल ट्रेन; 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार आरक्षण

Subscribe

सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वे मार्गावर दिवाळीनिमित्त 30 अतिरिक्त फेस्टिव्हल ट्रेन धावणार आहेत.

सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वे मार्गावर दिवाळीनिमित्त 30 अतिरिक्त फेस्टिव्हल ट्रेन धावणार आहेत. या 30 ट्रेनचे आरक्षण विशेष शुल्कासह 18 ऑक्टोबरपासून सर्व संगणकीकृत सुरक्षा केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू होणार आहे. (Western Railway 30 Festival train)

वांद्रे टर्मिनस ते गांधीधाम, भावनगर, भगत की कोठी आणि वडोदरा ते हरिद्वारदरम्यान या अतिरिक्त फेस्टिव्हल विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेच्या 30 अतिरिक्त फेस्टिव्हल ट्रेन

  • ट्रेन क्रमांक ०९४१५ वांद्रे टर्मिनस – गांधीधाम सुपरफास्ट स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी सायंकाळी ७.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता गांधीधामला पोहोचेल. ही ट्रेन २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९४१६ गांधीधाम – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल ही ट्रेन गांधीधामहून दर गुरुवारी रात्री १२.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २ .२० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक ०९२०७ वांद्रे टर्मिनस – भावनगर स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भावनगरला रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन २१ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९२०८ भावनगर – वांद्रे टर्मिनस स्पेशल भावनगरहून दर गुरुवारी दुपारी २.५० वाजता सुटेल आणि वांद्रे टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहोचेल. ही ट्रेन २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत धावेल. या दोन्ही ट्रेनच्या दहा फेऱ्या असणार आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९०९३ वांद्रे टर्मिनस – भगत की कोठी स्पेशल वांद्रे टर्मिनसवरून दर शनिवारी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबर रोजी धावेल.
  • ट्रेन क्रमांक ०९०९४ भगत की कोठी – वांद्रे टर्मिनस स्पेशल प्रत्येक रविवारी भगत की कोठी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक ०९१२९/०९१३० वडोदरा – हरिद्वार सुपरफास्ट स्पेशल ही ट्रेन २२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.

हेही वाचा – बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -