घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपंडित कॉलनी : जुन्या भांडणातून टोळक्याने केली युवकाला मारहाण

पंडित कॉलनी : जुन्या भांडणातून टोळक्याने केली युवकाला मारहाण

Subscribe

पंडित कॉलनीतील समर्थ वडापावच्या दुकानाजवळ तिघा संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाला लोखंडी फायटरने मारून दुखापत केली. सूर्या भास्कर गिते (रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड) याच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. ८) सकाळी साडेअकराच्या सुमारास संशयित निलेश गवई व त्याचे दोन मित्रांनी शिवीगाळ करीत मारहाण केली तर एकाने लोखंडी फायटरने मारून दुखापत केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आडगाव नाक्याजवळ रॉयल इनफिल्ड बुलेटची चोरी

तपोवनातील आडगाव नाक्याजवळ पार्क केलेली महागडी रॉयल इनफिल्ड बुलेट दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. नितीन समाधान भगत (रा. हनुमान नगर, जेलरोड) यांची १ लाख २५ हजारांची बुलेट (एमएच ०२ एफव्ही ६८६७) रविवारी (ता.७) सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान चोरीला गेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जेलरोड : टोळक्याने धारदार हत्यार, फायटरने केली मारहाण

जेलरोडवरील साने गुरुजीनगरमध्ये संशयित टोळक्याने मागील भांडणाची कुरापत काढून एकावर धारदार हत्यार व फायटरने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संशयित राहुल चाफळकर, अभिनव कुर्हे, सागर सूर्यवंशी व आठ-दहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार व नितीन दिलीप काकडे (रा. साने गुरुजीनगर, जेलरोड) या युवकाच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.७) रात्री साडेनऊच्या सुमारास संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून काकडे यास शिवीगाळ करीत त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करीत मारहाण केली व धारदार हत्यार व फायटरने मारले. तसेच वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी उपनगर पोलिसात संशयितांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मंगेश दसक करीत आहेत.

- Advertisement -

उपनगर : हटकल्याने चौघांनी केली एकाला मारहाण

उपनगर परिसरातील पार्वताबाई नगर येथे आरडाओरडा केल्याचा जाब विचारल्याने चौघांनी एकाला मारहाण केली. कैलास मधुकर आढाव (र. पिन्टो कॉलनी, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. ७) रात्री दहा वाजता संशयित देविदास तोरवणे व त्याचे तीन साथीदार हे आरडाओरडा करीत असताना, त्यांना आढाव यांनी हटकले. त्याचा राग धरून संशयितांनी शिवीगाळ करीत धारदार शस्त्राने मारून दुखापत केली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई नाका : सहा फुटांवरून पडल्याने युवकाचा मृत्यू

सहा फुटांवरून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. नवीन अशोक पंजाबी (४०, रा. पॅराडाईज प्लाझा, शिंगाडा तलाव, नाशिक) असे मयताचे नाव आहे. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता साई प्रितम हॉटेलच्या बाजुला सहा फुटावरून पंजाबी हे पडले. यात त्यांच्या मानेला, गुडघ्याला, गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आडगाव मेडिकल महाविद्यालयात उपचारासाठी दाखल असताना, मंगळवारी (ता. ८) त्यांचे निधन झाले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

इंदिरानगर : युवकाची आत्महत्या

पाथर्डी फाटा परिसरातील रो हाऊसमध्ये एकाने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. भट गंगाधर पाटील (४३, रा. साई सहवास रो हाऊस, दामोधरनगर, पाथर्डी फाटा) असे मयताचे नाव आहे. भट यांनी सोमवारी (ता. ८) राहत्या घरातील बेडरुममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -