घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'तीनदा आमदार केल त्यांचे नाही झाले तर तुमच काय?'; छगन भुजबळांचा भाजपला...

‘तीनदा आमदार केल त्यांचे नाही झाले तर तुमच काय?’; छगन भुजबळांचा भाजपला सवाल

Subscribe

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. याच अनुषंगाने महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात नाशिक येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी बोलताना भुजबळ यांनी तांबे पिता पुत्रावर सडकून टीका करत ‘ज्यांनी तीन वेळा आमदारकी दिली त्यांच्या सोबत असे वागले तर तुमचं काय?’ असा सवाल भाजपाला केला आहे.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण शुभांगी पाटील यांना आहे. पदवीधर मतदासंघात पहिल्या महिला उमेदवार म्हणून त्यांचा विजय पक्का असून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पुन्हा आपल्याला एकत्र यायचे आहे. तोपर्यंत सर्वांनी परिश्रम घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पूर्ण ताकदीने उभी राहील अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

- Advertisement -

डॉ. सुधीर तांबे यांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. एबी फॉर्म मिळालेला असताना उमेदवारी दाखल न करणे अशी घटना मी माझ्या आयुष्यात बघितलेली नाही, ही एक अक्षम्य चूक असून, डॉ. तांबे यांची माझ्या मनात आणि कॉंग्रेस पक्षात जी चांगला व्यक्ति ही प्रतिमा होती ती त्यांनी गमावली आहे. तसेच, त्यांच्याच परिवरातील जेष्ठ सदस्य आणि कॉंग्रेस पक्षाचे राज्याचे नेते बाळासाहेब थोरात यांनाही त्यांनी अडचणीत आणण्याची कृती केली आहे. जर, मुलाला उमेदवारी द्यायची होती तर तशी मागणी केली असती तर ती मिळाली असती, तुम्हाला रोखले कोणी होते?, असे वागणे चुकीचे होते’ असे म्हणत छगन भुजबळ यांनी तांबे पिता पुत्रावर सडकून सडकून टीका केली आहे. त्याच सोबत ‘ज्यांनी तीन वेळा आमदार केल त्या कॉंग्रेस पक्षासोबत तांबे असे वागले तर तुमचे काय घेऊन बसलात’ असे म्हणत भारतीय जनता पार्टीला सवाल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -