घरमहाराष्ट्रईडी नक्की करतंय काय? पीएमएलए कोर्टात एकही खटला पूर्ण नाही; न्यायाधीशांची चपराक

ईडी नक्की करतंय काय? पीएमएलए कोर्टात एकही खटला पूर्ण नाही; न्यायाधीशांची चपराक

Subscribe

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून ईडीने अनेक ठिकाणी धाडी मारून संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यातच, संजय राऊत यांच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना पीएमएल कोर्टाचे न्यायाधीश एम.जी.देशपांडे यांनी ईडीला चपराक लगावली आहे. पीएमएल कोर्ट सुरू झाल्यापासून एकही खटला पूर्ण झालेला नाही आणि याचं श्रेय ईडीला जातं, असं पीएमएलए कोर्टाचे न्यायमूर्ती एम.जी.देशपांडे म्हणाले.

हेही वाचा – …म्हणून पत्रावाला चाळ प्रकरणात शरद पवारांचे नाव, पीएमएलए कोर्टाकडून ईडीची कानउघाडणी

- Advertisement -

संजय राऊत यांना काल पीएमएल कोर्टाने जामीन दिला. १०२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर त्यांची जामिनावर सुटका झाली. हा जामीन देताना पीएमएलए कोर्टाने काही निरिक्षणं नोंदवली आहेत. यामध्ये ईडीवर त्यांनी ताशेरे ओढले. एम.जी देशपांडे यांनी नमूद केलं की, “पीएमएलए कोर्ट स्थापन झाल्यापासून एकही खटला पूर्ण झालेला नाही आणि याचं श्रेय ईडीला जातं. या न्यायालयाच्या स्थापनेपासून एकही खटला पूर्णपणे चाललेला नाही, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. ईडीने सादर केलेल्या पुराव्यांद्वारे निष्कर्ष काढून न्यायालयाला गेल्या दशकापासून एकही निर्णय देता आलं नाही. कोर्टाच्या स्थापनेपासून आणि माझ्या संपूर्ण कार्यकाळात एकही निर्णय झालेला नाही.”

हेही वाचा – राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर, पीएमएलए कोर्टाने ईडीला झापलं

- Advertisement -

ईडी तपास करण्यासाठी अधिक वेळ मागते. ईडीकडून चपळाईने अटक केली जाते. पण खटले मात्र गोगलगायींच्या गतीने चालवले जातात. खटला पूर्ण न करण्यास ईडी जबाबदार नाही का, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.

पीएमएलए कोर्टात खटला चालवण्याची तरतूद आहे, हे ईडी विसरली आहे. प्रवीण राऊतांनी मे महिन्यात जामिनासाठी अर्ज केला होता. ते अंडरट्रायल कैदी आहेत हे माहित असूनही ईडीने महिन्याभरापेक्षा जास्त वेळ घेतला. त्यामुळे कोणत्याही आरोपीने दाखल केलेल्या साध्या अर्जांनाही उत्तर देण्यास ईडीने दिरंगाई केली आहेस असं न्यायालायने नमूद केलं आहे.

हेही वाचा देशाची घटनाच गोठवण्याचा प्रयत्न होतोय; संजय राऊतांचा घणाघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -