घरमहाराष्ट्रनागपूरातील रिफायनरी प्रकल्पाच्या पत्राचे काय झाले? सचिन सावंतांचा फडणवीसांना प्रश्न

नागपूरातील रिफायनरी प्रकल्पाच्या पत्राचे काय झाले? सचिन सावंतांचा फडणवीसांना प्रश्न

Subscribe

नागपुरात रिफायनरी प्रकल्प करण्यात यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी ते राज्याचे विरोधी पक्षनेते असताना केली होती. मग अशा प्रकारची मागणी ते आता बारसुमधील विरोधावर का करत नाहीयेत, असा प्रश्न काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात सध्या बारसु रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापले आहे. हा रिफायनरी प्रकल्प आधी कोकणातील नाणार येथे करण्यात येणार होता. पण या गावातील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केल्याने हा प्रकल्प रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात असलेल्या बारसु गावात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण या गावातील ग्रामस्थांनी देखील या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आंदोलन सुरू केले आहे.

या प्रकरणावरून राजकारण देखील सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता सत्ताधारी विरूद्ध विरोधक आमने-सामने आलेले आहेत. पण आता मुद्द्यामुळे आणखी एका रिफानरी प्रकल्पाचा मुद्दा समोर आला आहे. नागपुरात रिफायनरी प्रकल्प करण्यात यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी ते राज्याचे विरोधी पक्षनेते असताना केली होती. मग अशा प्रकारची मागणी ते आता बारसुमधील विरोधावर का करत नाहीयेत, असा प्रश्न काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे ट्वीट सचिन सावंत यांच्याकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

सचिन सावंत यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “बारसू येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्यांनी विरोधाची सुपारी घेतली आहे असा आरोप करणाऱ्या सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते असताना नागपूर येथे रिफायनरी व्हावी या मागणीसाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठवलेल्या पत्राचे काय झाले याचे उत्तर दिले पाहिजे.” सचिन सावंत यांच्या या ट्वीटमुळे याबाबत देखील आता प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते असताना त्यांनी रिफायनरी प्रकल्प नागपुरात व्हावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी देखील नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प तयार करण्याला नाणार वासियांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे मनाचा मोठेपणा दाखवत फडणवीसांनी नागपुरात रिफायनरी तयार करण्याची मागणी केली होती. पण आता बारसुमध्ये रिफायनरीला जोरदार विरोध होत असताना देखील देवेंद्र फडणवीस शांत का? आणि त्यांनी त्यावेळी केलेल्या मागणीचे काय झाले? असा प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित करत आणखी एका मुद्द्याला वाट मोकळी करून दिल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा – लोअर परळ पूल खुला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार! – मंत्री मंगल प्रभात लोढा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -