घरमुंबईलोअर परळ पूल खुला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार! - मंत्री मंगल प्रभात...

लोअर परळ पूल खुला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार! – मंत्री मंगल प्रभात लोढा

Subscribe

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (Lower Paral Bridge) येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाचा पहिला टप्पा मे महिन्याच्या अखेरीस सुरु होईल व संपूर्ण पुलाचे काम 15 जुलैच्या आधी पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महापालिका व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लोअर परळ पुलाच्या पाहणी दरम्यान उपस्थित माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

लोअर परळ पूल धोकादायक असल्याने तो बंद केल्यानंतर या पुलाचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु मधल्या काळात काही कारणास्तव पुलाचे काम संथ गतीने सुरु होते. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या कामाने गती घेतली असून पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु पूल बंद असल्यामुळे स्थानिक रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून परळ, दादर टीटी आणि महालक्ष्मी येथे वाहतूक प्रभावित झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘…त्याचे परिणाम महाराष्ट्रभर भोगावे लागतील’, ‘बारसू’वरून आव्हाडांचा सरकारला इशारा

पुलाच्या कामाची पाहणी करत असताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत पाहणी केली व यापूर्वी जे झाले ते झाले, ते सर्व बाजूला ठेऊन, नागरिकांसाठी वेळेत पूल सुरु करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.

- Advertisement -

३१ मे पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
मागील वर्षी जून आणि डिसेंबरमध्ये याआधीच्या दोन मुदती चुकवल्यानंतर बीएमसीने 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. तथापि, नवी मुंबईतील रेडी मिक्स कॉंक्रीट प्लांटमधून येणाऱ्या खडीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे कामावर परिणाम झाला होता, मात्र कामाची गुणवत्ता राखण्यासाठी आम्हाला खडीचा पुरेसा पुरवठा हवा होता. आता काम पूर्णत्वाच्या जवळ आले आहे आणि लोअर परळ पुलाची पूर्व बाजू जुलैपर्यंत उघडली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -