घरमहाराष्ट्रअनलॉक-२ म्हणजे काय ते स्पष्ट करा - देवेंद्र फडणवीस

अनलॉक-२ म्हणजे काय ते स्पष्ट करा – देवेंद्र फडणवीस

Subscribe

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने राज्य सरकारने आज ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनलॉक २.० ची घोषणा केली. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अनलॉक-२ म्हणजे काय? असा सवाल केला आहे. अनलॉक-२ म्हणजे काय? याचा खुलासा करावा, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. “अनलॉक-2 म्हणजे काय? आणि त्यात काय सुरू होणार आणि काय नाही, याचा सुस्पष्ट खुलासा झाला पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात आज ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. ३० जून रोजी लॉकडाऊन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असून सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -