घरमहाराष्ट्रपुणेकोण संजय राऊत...अजित पवारांचा खोचक सवाल

कोण संजय राऊत…अजित पवारांचा खोचक सवाल

Subscribe

पुणेः कोण संजय राऊत. मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. मी माझ्या पक्षासंदर्भात बोललो होतो. त्यामुळे कोणाला काही लागायचं काहीच कारण नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुणे येथे केले.

अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुम्ही सांगितल्यानंतरही संजय राऊत हे सल्ले देत आहेत, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. महाविकास आघाडीची मांडणी करण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अजित पवार आणि त्यांच्या सुरु असलेल्या वादामुळे सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर भाजप दबाव टाकत आहे. तपास यंत्रणांचा वापर करुन भाजप फोडाफोडीचं राजकरण करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. आमची वकीली कोणी करु नये. आमच्या पक्षाचा प्रवक्ता आमच्या विषयी बोलेल, असा सल्ला अजित पवार यांनी दिला होता. मी केवळ शरद पवार यांचेच ऐकेन. बाकी कोणाचंच ऐकणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक असताना अजित पवार यांनी केलेल्या नवीन वक्तव्यामुळे त्यांच्यातील वाद अजून वाढण्याची शक्यता आहे.

यावेळी अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कामाचा आढावा घेतला. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण मला नाही. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने सरकारने पुढील दिशा ठरवायला हवी. यासाठी सरकारने विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

- Advertisement -

निवडणुका होण्याची चिन्हे आहेत, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, मी निवडणूक अधिकारी नाही. जेव्हा निवडणूक अधिकारी होईन तेव्हा मी नक्की सांगेन की निवडणुका कधी होतील. फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणुका होणार होत्या. त्यावेळी अनेक इच्छूकांनी तयारी केली. देव दर्शन केले. निवडणुका काही झाल्या नाहीत. आता सर्व इच्छूक कंटाळले आहेत. प्रशांत जगताप यांचे भावी खासदार असे बॅनर लागले आहेत. प्रशांतला माझ्या शुभेच्छा, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -