घरमहाराष्ट्रयंदाच्या कोजागिरी पौर्णिमेचा हा आहे शुभ मुहूर्त

यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेचा हा आहे शुभ मुहूर्त

Subscribe

कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ही पौर्णिमा पावसानंतरची पहिली पौर्णिमा असते त्यामुळे हिला अश्विन पौर्णिमा असेही म्हणतात. आज रात्री कोजागिरी सण साजरा केला जाणार आहे.

कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ही पौर्णिमा पावसानंतरची पहिली पौर्णिमा असते त्यामुळे हिला अश्विन पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू सणानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा येते. पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याला येते. परंतू शरद पौर्णिमेचे महत्त्व अधिक आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्येही या पौर्णिमेला विशेष मान्यता आहे. या वर्षी कोजागिरी पौर्णिमा ही १३ ऑक्टोबरला, रविवारी आली आहे. पावसात आकाश स्वच्छ नसते परंतू या पौर्णिमेला आकाश खुप दिवसानंतर स्वच्छ आणि सुंदर दिसते. त्यामुळे याचा आनंद घेता यावा व याचे स्वागत करावे म्हणून सण साजरा करतात.

अश्विन पौर्णिमेची रात्र कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवून हिंदू धर्मात लक्ष्मी आणि इंद्राची आराधना केली जाते. चांगल्या आरोग्यासाठी कोजागिरीच्या रात्री व्रत केली जाते. कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरते आणि को जागती, असा प्रश्न विचारते आणि त्याला वैभवप्राप्ती मिळते, अशी आख्यायिका आहे.

- Advertisement -

हा आहे शुभ मुहूर्त

पौर्णिमा तिथी प्रारंभ : १३ ऑक्टोबर २०१९ रात्री १२.३६ मिनिटं

काय आहे महत्त्व

या पौर्णिमेला रात्री दुध गर्माकारून त्यामध्ये चंद्राला पाहतात. चंद्र या दिवशी ९९.९९ टक्के असतो. चंद्र या दिवशी ३ लक्ष ८५ हजार किलो मीटर अंतरावर असतो. त्यामुळे या रात्री वातावरण छान असते, आकाश खुले असते म्हणून ही रात्र मौजमजा करण्याचा असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २००५ नंतर कोजागिरीच्या पौर्णिमेच्या वेळीस चंद्रग्रहण आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

दुबळे विरोधक लोकशाहीसाठी घातक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -