घरमहाराष्ट्रभाजपा लोकांची माफी मागणार का? 'त्या' प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक

भाजपा लोकांची माफी मागणार का? ‘त्या’ प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक

Subscribe

मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. यातील बहुतांश जण केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यापैकीच एक वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आहेत. त्यांच्या जावयाच्या कंपनीला समाजकल्याण विभागाकडून कंत्राट देण्यात आले असून त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे – विजय वडेट्टीवार

- Advertisement -

कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधील अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना 2014मध्ये ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला 10 वर्षांसाठी चालवायला दिला. यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही. तसेच, ब्रिक्स इंडिया कंपनी ही मंत्री हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांची बेनामी कंपनी असून मुश्रीफ आणि जावई यांनी मिळून यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी केला होता. शिवाय, यासंदर्भात त्यांनी ईडीकडे तक्रारही नोंदवली होती. त्याअनुषंगाने ई़डीने मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी तसेच ब्रिक्स इंडिया कंपनीच्या पुण्यातील कार्यालयावर छापेमारी देखील केली होती.

- Advertisement -

याच संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आक्रमक होत भाजपावर निशाणा साधला आहे. ब्रिक्स इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ यांच्या जावयाची बेनामी कंपनी असून या कंपनीला कोणताही अनुभव नसताना बेकायदा पद्धतीने अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालवण्यास दिल्याचा आणि मनी लाँडरिंग झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपाकडून करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदा आणि कोल्हापूर दौरा या माध्यमातून रान उठवले होते, याचे स्मरण त्यांनी करून दिले.

हेही वाचा – आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमधील मंत्र्यांमध्ये जुंपली, जयंत पाटील म्हणतात…

आज याच कंपनीला समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले. यामुळे राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजपा लोकांची माफी मागणार का? असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -