घरमहाराष्ट्रकाही नेत्यांना डेंग्यू झालाय, तर काही लपलेयत; पटोलेंचा अजित पवारांसह भाजपला टोला

काही नेत्यांना डेंग्यू झालाय, तर काही लपलेयत; पटोलेंचा अजित पवारांसह भाजपला टोला

Subscribe

राज्यातील सरकारमध्ये काहीही अलबेल नाही. सरकारमधील नेत्यांना डेंग्यू झाला आहे तर काही कुठे गायब झाले आहेत. राज्यातील इतर प्रश्नांना बगल देऊन हे जातीचं राजकारण पेटतं ठेवण्याचा या सरकारचा डाव आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी अजित पवारांना टोला लगावला.

मुंबई: राज्यातील मूळ प्रश्नांपासून बगल देण्यासाठी भाजपने आरक्षणाचा नवा डाव रचला आहे. सरकारमधीलच दोन मंत्री वेगवेगळी मतं मांडत आहेत. तसंच ,हे सरकार आता जास्त काळ टिकणार नाही हे एका मंत्र्याने सुद्धा म्हटलेलं आहे. यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय चालू आहे हे राज्याच्या जनतेला कळायला हवं. आता नको ते मुद्दे समोर आणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, महागाई, बेरोजगारी या विषयांवर पडदा पाडण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे का? असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Some leaders have dengue some are hiding Nana Patole s challenge to BJP along with Ajit Pawar)

नाना पटोले म्हणाले की, जे ड्रग्ज गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे त्यामुळे राज्यातील तरूण पिढी व्यसनाधीन होत आहे. हे लपवण्यासाठी सरकार आरक्षणाचा मुद्दा समोर आणत आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसंच,  राज्यात सुरू असलेला हा खेळखंडोबा भाजपने थांबवावा, अशी मागणी पटोलेंनी यावेळी केली.

- Advertisement -

आम्हाला ड्रग्जमुक्त महाराष्ट्र हवा

नाना पटोले म्हणाले की, जळता महाराष्ट्र आम्हाला नको हा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ड्रग्जच्या विळख्यात अडकलेला महाराष्ट्र नको या राज्याला ड्रग्ज मुक्त करा. राज्यातील उद्योगधंदे गुजरातला का जात आहेत, याचंही उत्तर भाजपने द्यावं आणि वस्तुस्थिती मांडावी असं नाना पटोले म्हणाले.

अजित पवारांना टोला

राज्यातील सरकारमध्ये काहीही अलबेल नाही. सरकारमधील नेत्यांना डेंग्यू झाला आहे तर काही कुठे गायब झाले आहेत. राज्यातील इतर प्रश्नांना बगल देऊन हे जातीचं राजकारण पेटतं ठेवण्याचा या सरकारचा डाव आहे, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. तसंच, या सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी  यावेळी केली.

- Advertisement -

(हेही वाचा: “ओबीसी आणि मराठा समाजातील वाद मिटवण्यासाठी सरकारने तोडगा काढावा”, विजय वडेट्टीवारांची मागणी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -