घरताज्या घडामोडीइराणमधून आज २०० भारतीयांना मायदेशात आणणार

इराणमधून आज २०० भारतीयांना मायदेशात आणणार

Subscribe

इराणमध्ये ६००० भारतीय अडकले आहेत. यामध्ये १,१०० महाराष्ट्राचे आहेत.

करोनाने देशात शिरकाव केला असून आतापर्यंत देशात ७४जण करोनाबाधित आहेत. तर राज्यात १४ करोनाग्रस्त आहेत. हे सर्व परदेशातून आले होते. दरम्यान, आज इराणमधून २०० जणांना आज मुंबईत आणणार आहेत. इराणमध्ये ६००० भारतीय अडकले आहेत. इराणमध्ये जोरात करोनाचा फैलाव होत आहे. यामध्ये १,१०० महाराष्ट्राचे आहेत. या सर्वांना विमानतळाहून थेट वेगळ्या कक्षात घेऊन जाणार आहेत.


हेही वाचा – दिलासादायक! चीनमध्ये करोनाचा जोर ओसरला

- Advertisement -

दरम्यान, राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. पुण्यामध्ये ९, मुंबईत ३, ठाण्यात १ आणि नागपुरात १ रुग्ण आहे. अमेरिकेहून नागपुरमध्ये दाखल झालेल्या व्यक्तिची वैद्यकिय चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये करोना पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर १० लाख ५७ हजार लोकांचे विमानतळावर स्क्रिनिंग करण्यात आले आहे. जगभरात करोना फोफावला असून ४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -