घरताज्या घडामोडीCoronavirus : दिल्लीतील शाळा - महाविद्यालयांना सुट्टी, थिएटर्सही बंद

Coronavirus : दिल्लीतील शाळा – महाविद्यालयांना सुट्टी, थिएटर्सही बंद

Subscribe

दिल्लीत करोनाचे पाच रुग्ण आढळून आल्याने दिल्लीतील शाळा - महाविद्यालय आणि चित्रपटगृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा फैलाव भारतात वाढत असून हा व्हायरस आता दिल्लीत येऊन देखील धडकला आहे. दिल्लीत करोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सगळीकडे पसरत असलेला हा आजार आणखी पसरु नये, यासाठी आता खबरदारी घेण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे दिल्लीतील शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दिल्लीतील चित्रपटगृह देखील बंद ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले केजरीवाल?

करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच ज्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परिक्षा सुरु आहेत. त्या शाळा सोडून इतर शाळा बंद राहणार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केरळमध्ये देखील असा निर्णय घेण्यात आला होता. केरळमध्ये करोना व्हायरसचे ६ संशयित आढळून आल्यानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला होता. सार्वजनिक कार्यक्रमांसह चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे करोनामध्ये ही संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केरळमध्ये देखील हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

पुण्यात देखील सर्व शाळा – महाविद्यालय बंद करा

पुण्यामध्ये नऊ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा व्हायरस अजून पसरु नये, याकरता पुण्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी पालक संघटनेकडून केली जात आहे.


हेही वाचा – करोना व्हायरस : शाळा ३१ मार्चपर्यंत बंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -