अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत याचं मौन

shiv sena sanjay raut slams on opposition party over National Investigation Agency raid
NCBने पुरवलेल्या गांजाच्या नशेत ते पडतील, ठाकरे सरकार नाही; राऊतांचा विरोधकांना इशारा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणाला कोणतं खातं मिळतंय याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं होत. मात्र आज सकाळी महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला असल्याचं समोर येत आहे. या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया की, ‘हा राजीनामा का दिला आहे?’ असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच ‘मला हा विषय माहित नाही आणि मी याविषयी कोणतेही वक्तव्य करणार नाही’, असं म्हणतं त्यांनी मौन पाळलं आहे.

‘जे नाराज आहेत, ते मूळचे शिवसैनिक नाहीत. बाहेरुन शिवसेनेत आले आहेत. त्यांना शिवसेनेत परिस्थितीशी जुळवन घेण्यास काहीसा वेळ लागत आहे. त्यापैकी अब्दुल सत्तार असावेत. ते पक्षात आले आहेत, त्यांना शिवसेनेने स्वीकारलं आहे. त्यांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे. मरेपर्यंत शिवबंधन सोडणार नाही, असा शब्द अब्दुल सत्तार यांनी दिला होता. ते शब्द पाळणारे नेते आहेत’, असं संजय राऊत म्हणाले.

‘खातेवाटप विलंबाबाबत मुख्यमंत्री सांगितली’ 

‘खातेवाटपाला विलंब होणे हे बरोबर नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाले आहे. त्यामुळे खातेवाटप हा गंभीर विषय असू नये. सरकार मधलं किंवा राज्यातलं प्रत्येक खातं हे तोलामोलाचं असतं. कोणतंही खातं कमी महत्त्वाचं असणं हा राज्यातील जनतेचा आणि सरकारचा अपमान असतो. प्रत्येक खात्यांमध्ये काम करून राज्याचा विकास करणं हे मंत्र्याचं काम आहे. त्याच्यामुळे आता वजनदार खाती, मलईदार खाती, महत्त्वाची खाती यांच्या व्याख्या ठरायला पाहिजे. कॅबिनेट मंत्री जो असतो त्याने आपलं काम चोखपणे करायचं असतं आणि राज्यातील प्रत्येक विभाग सक्षमपणे काम करतो तेव्हा राज्य पुढे जातं. तसंच खातेवाटपाला विलंब का होत आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगितली’, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना सांगितलं.


हेही वाचा – शिवसेनेला धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा