देशात लॉकडाऊन लावणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन

Birsa Munda to set up 9 more museums in the country - Prime Minister Narendra Modi

अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करून या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता, असे मत व्यक्त करतानाच कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत होते.

100 वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरोधात भारताची लढाई आता तिसर्‍या वर्षात प्रवेश करत आहे. परिश्रम हा आपला एकमात्र मार्ग तर विजय हा एकमात्र पर्याय आहे. आपण 130 कोटी भारताचे लोक, आपल्या प्रयत्नातून कोरोनावर नक्की विजय मिळवू. ओमायक्रॉनबाबत सुरुवातीला जी संशयाची स्थिती होती ती आता कमी होत आहे. सुरुवातीला जे व्हेरियंट होते त्यापेक्षा कितीतरी पट अधिक वेगाने ओमायक्रॉन नागरिकांना संक्रमित करत आहे. आपल्याला सतर्क राहावे लागणार आहे. मात्र, पॅनिक होऊन चालणार नाही. आपल्याला हे पाहावे लागणार आहे की, सणासुदीच्या काळात लोक आणि प्रशासन अलर्टनेसमध्ये कुठेही कमी पडणार नाही, अशी सूचना मोदींनी सर्व राज्यांना केली आहे.

सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी ज्याप्रमाणे सजगता, सक्रियता आणि सहकार्याची भूमिका ठेवली, तोच यावेळी विजयाचा मंत्र आहे. भारतात बनलेली लस जगभरात आपली श्रेष्ठता सिद्ध करत आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा विषय आहे की आज भारताने जवळपास 92 टक्के वयोवृद्ध लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. तर लसीच्या दुसर्‍या डोसचे देशातील प्रमाण जवळपास 70 टक्क्यांच्या आसपास पोहोचले आहे. 10 दिवसांच्या आत भारताने आपल्या जवळपास 3 कोटी युवकांना लस दिली आहे. हे भारताचे सामर्थ्य दाखवते, या महामारीला सामोरे जाण्यासाठी आपली तयारी दर्शवते’, असेही मोदी यांनी सांगितले.

महाराष्ट्राला बोलू दिले नाही
पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीला उपस्थित होते. मात्र, पाच ते सहा मुख्यमंत्र्यांनाच बोलायला दिले. महाराष्ट्राला बोलायला दिले नाही. आम्ही आमच्या मागण्या लिखित स्वरुपात मांडल्या, असे राजेश टोपे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.