घरमहाराष्ट्रपाण्यासाठी महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

पाण्यासाठी महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

Subscribe

पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या काकोळे गावातील महिलांनी पाणी मिळण्याच्या मागणीसाठी छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.

गेल्या 3 वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या काकोळे गावातील महिलांनी पाणी मिळण्याच्या मागणीसाठी छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. अंबरनाथ तालुक्यातील काकोळा गावात ब्रिटिशकालीन धरण आहे, हे धरण रेल्वे विभागासाठी बांधण्यात आले होते मात्र सध्या तेथे रेल्वे प्रशासनाने “नीर” हा शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारला आहे. यामुळे या धरणाजवळ राहून देखील काकोळा गावातील गावकऱ्यांना गेल्या 3 वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे.

महिलांना दररोज तीन ते चार किलोमीटर पायपीट करून पाणी आणण्यासाठी जावे लागते. केवळ महिला दिनाला महिलांचा सन्मान केला जातो मात्र एरवी त्यांचे हालच असतात, गावातील अशिक्षित लोकांचा गैरफायदा घेऊन तहसीलदार व पंचायत समिती दिशाभूल करीत आहेत. पाण्यासाठी धावपळ करतांना अनेकदा महिलांचे अपघात झालेले आहेत काहींना अपंगत्व देखील आलेले आहे. असे आरोप महिला करत आहेत.

- Advertisement -

तहसीलदार कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर महिलांनी हांडे ,कळशी, कावडी घेऊन ठिय्या आंदोलन केले. त्याचप्रमाणे “धरण उशाला, “कोरड घशाला, अशा घोषणा महिलांनी केल्या. यानंतर मोर्चेकर्त्यांनी आपल्या मागणीचे एक लेखी निवेदन तहसीलदार कार्यालयात दिले, त्यावेळी त्यांना ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच तहसीलदार (अंबरनाथ तालुका)काकोळा गावात पाणी पुरवठा करण्यासाठी एम आय डी सी ची जलवाहिनी जोडण्यात येत आहे तसेच बोअरिंग खोदण्याचे काम सुरू आहे लवकरच त्यांना सुरळीतपणे पाणी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -