पवारसाहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळच असतं – यशोमती ठाकुर

कुणी कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र स्थिरच राहणार, असं यशोमती ठाकुर म्हणाल्या.

Yashomati Thakur said that Sharad Pawar should have been the CM of Maharashtra

काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकुर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पवारसाहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे, असं यशोमती ठाकुर म्हणाल्या. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची ५७ वी पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम रविवारी अमरावतीत पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यशोमती ठाकुर म्हणाल्या,”साहेब एवढा भयाण हल्ला झाला. प्रत्येकजण मला विचारत होते येणार आहेत का साहेब….पण साहेब तुम्ही आलात, तुमच्या हिमतीची दादच दिली पाहिजे. तुम्ही थकत कसे नाही. आमच्यापेक्षा चारपट वयाचे तुम्ही आहात आणि तुम्ही थाबंत कसे नाही. कौतुकच वाटतं. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही जी जी करता, ती ती अंगी वळणी पाडण्यासारखी आहे. साहेब आपण जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात…तर महाराष्ट्राचं चित्र अजून काही राहिलं असतं. चार वेळा साहेब मुख्यमंत्री होते. पण आज काळाची गरज आहे. पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. त्यामुळे कोणी काहीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार.”

ज्याशिक्षण संस्थेत मी शिक्षण घेतले, त्याच श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्याचं भाग्य मला लाभले याचे मला आज समाधान वाटते. आज बाबांची उणीव भासते असे ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या. संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब यांचे कार्य

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

यांनी अतिशय कष्टातून आणि लोकांच्या कल्याणासाठी उभारलेल्या या शिक्षण संस्थेमुळे या परिसरातील अनेक विद्यार्थी शिकू शकले. शिक्षणाचा हा वसा हर्षवर्धन देशमुख यांनी अव्याहतपणे पुढे सुरु ठेवला असून अतिशय दर्जेदार शिक्षण या महाविद्यालयातून दिले जात आहे, असे सांगत या महाविद्यालयासाठी आपण यापुढेही सातत्याने मदत करत राहू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.