घरमहाराष्ट्रयेरवडा कारागृहातील कैद्यांना मिळणार सौरऊर्जेवरील जेवण

येरवडा कारागृहातील कैद्यांना मिळणार सौरऊर्जेवरील जेवण

Subscribe

पुणे- ‘इंधनाची बचत करा,’ हा संदेश सगळेच देतात. मात्र वास्तविक जीवनात त्याचे अवलंबन करणारे कमीच असतात. येरवडा कारागृहात हे सामाजिक भान जपले आहे. येथे इंधनाची बचत व्हावी याकरता कैद्यांचे जेवण सौरऊर्जेवर बनवले जात आहे. त्यामुळे येरवड्यातील कैद्यांना आता सूर्य प्रकाशावर भाजल्या जाणाऱ्या चपात्या खायला मिळणार आहेत. भारतात पहिल्यांदाच येरवडा कारागृहातील महिला कैद्यांकरता हा प्रयोग केला जात आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात महिला आणि पुरूष मिळून पाच हजारहून अधिक कैदी आहेत. त्यांच्या जेवणाकरता दररोज गॅसचे १८ सिलेंडर वापरले जातात. त्यातील महिला विभागातच तीन सिलेंडर्सचा वापर होतो. या परिसरात बायोगॅसचीही सुविधा आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या वापराची संख्या २८ वरून १८ वर आली आहे. सौरऊर्जेच्या वापरामुळे २८९ महिला कैदी आणि त्यांच्या १७ मुलांसाठी जेवण बनवणे सोईस्कर होत आहे.

- Advertisement -

गेल्या १० दिवसांपासून केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलार मिशन योजनेअंतर्गत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) विभागातर्फे हा प्रकल्प राबवला उभारला जात होता. सौरऊर्जेची सुविधा कारागृहातील स्वयंपाकघराच्या मागील बाजूस उपलब्ध करण्यात आली आहे. याला नागपूरच्या एका कंपनीने जेवण बनवण्याची साधनसामुर्गी दिले आहे. कारागृहातील दहा महिलांना याच्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कारागृहात भाजी- चपातीपासून, डाळ- भात, दूध तापवणे या सर्वच गोष्टी आता सौरऊर्जेवर बनवल्या जात आहेत. या प्रकल्पासाठी कारागृह प्रशासनाने १६ लाख इसका खर्च केला आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -