घरमहाराष्ट्रउंटाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

उंटाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

Subscribe

उंटाच्या हल्ल्यात एका १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी उंटासहित उंटाच्या मालाकाला ताब्यात घेतले आहे.

उंटाच्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणी येथे घडली आहे. समीर शमशोद्दीन (१६) असे मृत मुलाचे नाव आहे. आज सकाळी परभणी येथे उरुसानिमित्त संदल मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत उंटांचा समावेश होता. त्यातील एका उंटाने अचानक गोंधळ घातला. या पिसळलेल्या उंटाने समीर या तरुणावर हल्ला केला आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

परभणी येथील तुराब उल हक बाबाच्या उरुसाचा शुभारंभ शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला होता. तसेच सायंकाळी उरुसानिमित्त संदल मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले होते. या मिरवणुकीत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या मिरवणुकीत अचानक एका बिथरलेल्या उंटाने एकच गोंधळ केला. या पिसाळलेल्या उंटाचे रौद्ररुप पाहून नागरिकांनी पळापळ करण्यास सुरुवात केली. मात्र या दरम्यान उंटाने समीर शमशोद्दीन याच्यावर झडप घालत त्याच्या मानेवर हल्ला केला. या दरम्यान मिरवणुकीतील नागरिकांनी उंटाच्या तावडीतून कशीबशी समीरची सुटका केली आणि त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उंटाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या समीरला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. याप्रकरणी उंटासहित उंटाच्या मालाकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

वाचा – पुणे : मुंढवा – केशवनगर येथे धुमाकुळ घालणारा बिबट्या जेरबंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -